विखे यांचा राष्ट्रवादीसोबत उघड संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 01:08 PM2019-03-15T13:08:33+5:302019-03-15T13:08:37+5:30

राज्यात शरद पवार व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हा वाद जाहीरपणे पेटला आहे.

Discussed with Viktak | विखे यांचा राष्ट्रवादीसोबत उघड संघर्ष

विखे यांचा राष्ट्रवादीसोबत उघड संघर्ष

Next

सुधीर लंके
अहमदनगर : राज्यात शरद पवार व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हा वाद जाहीरपणे पेटला आहे. त्यामुळे विखे यांचा राष्टÑवादीसोबत उघड संघर्ष सुरु झाल्याचे मानले जाते. नगर जिल्ह्यात राष्टÑवादी व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात या दोघांचीही ताकद आता विखे यांच्या विरोधात एकवटण्याची शक्यता आहे.
‘शरद पवार हे दिवंगत बाळासाहेब विखे यांच्याबाबत चुकीचे बोलले’ अशी नाराजी विखे यांनी व्यक्त केली आहे. मी नगर जिल्ह्यात आघाडीचा प्रचार करणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले. नगर लोकसभा मतदारसंघात आपला मुलगा सुजय हाच भाजपचा उमेदवार असल्याने विखे यांना आघाडीचा प्रचार करणे मुळात अडचणीचे होते. मात्र, ते आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातही प्रचार करणार नाहीत. शिर्डीची जागा शिवसेनेच्या कोट्यात असल्याने तेथे आपल्या उमेदवाराला मदत करण्याचा शब्द उद्धव ठाकरे यांनी सुजय यांचेकडून घेतला आहे. सुजय यांना नगरमध्ये सेनेची मदत हवी असेल तर शिर्डीत त्यांना सेनेच्या पाठिशी रहावे लागेल. मुलाची ही अडचण नको म्हणूनच विखे यांनी शिर्डीतही अलिप्त राहण्याचे धोरण घेतले, असा राजकीय अर्थ यातून आता काढला जात आहे.
शिर्डी मतदारसंघ काँग्रेसच्या कोट्यात आहे. नगर मतदारसंघ क ाँग्रेसच्या कोट्यात नसताना त्याच्यासाठी विखे आग्रही राहतात. मात्र, शिर्डीत रस दाखवत नाहीत, या बाबीचे राष्टÑवादी व थोरातही आता दिल्लीपर्यंत भांडवल करण्याची शक्यता आहे. विखे यांनी थोरात यांच्यावरही टीका केली आहे. थोरात यांनी विधानसभेची पहिली निवडणूक काँग्रेसच्या विरोधात अपक्ष लढवली होती. त्यामुळे ते निष्ठावान आहेत का? असा प्रश्न त्यांनी केला. हा संघर्ष आता तीव्र होईल.
विखे यांना प्रत्युत्तर म्हणून शिर्डीत थोरात, राष्ट्रवादीचे मधुकर पिचड हे एकवटण्याची शक्यता आहे. तेथे काँग्रेसचा उमेदवार कोण राहणार हीही उत्सुकता आहे.

पवार देऊ शकतात थोरात यांना ताकद
एकाच वेळी पवार व थोरात या दोघांशीही विखे यांचा संघर्ष सुरु झाला आहे. विखे यांनी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यास काँग्रेसकडे हे पद टिकविण्यासाठी संख्याबळ कमी पडेल अशी स्थिती आहे. मात्र, या पदासाठी थोरात यांचे नाव पुढे आल्यास राष्टÑवादी पाठिंबा देऊ शकते. विखे यांची कोंडी करण्यासाठी शरद पवार भविष्यात ही खेळी खेळतील अशी चर्चा सुरु आहे

Web Title: Discussed with Viktak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.