नाव नाही घेतले : लग्नात निवेदकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 06:31 PM2019-03-06T18:31:03+5:302019-03-06T18:32:10+5:30

लग्नसमारंभात स्वागतासाठी नाव न घेतल्याने तिघांनी निवेदकाला त्याच्या घरी जाऊन जबर मारहाण केली़ २४ फेब्रुवारी रोजी नगर तालुक्यातील खोसपुरी येथे ही घटना घडली़

Did not get the name: The announcer at the wedding | नाव नाही घेतले : लग्नात निवेदकाला मारहाण

नाव नाही घेतले : लग्नात निवेदकाला मारहाण

Next

अहमदनगर : लग्नसमारंभात स्वागतासाठी नाव न घेतल्याने तिघांनी निवेदकाला त्याच्या घरी जाऊन जबर मारहाण केली़ २४ फेब्रुवारी रोजी नगर तालुक्यातील खोसपुरी येथे ही घटना घडली़ या गुन्ह्यातील आरोपींवर एमआयडीसी पोलिसांनी काहीच कारवाई न केल्याने फिर्यादीने मंगळवारी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे़
खोसपुरी येथील हरिभाऊ किसन हारेर हे २४ फेब्रुवारी रोजी राहुरी येथे पाहुण्यांच्या लग्नसमारंभात गेले होते. लग्नात ते निवेदक म्हणून काम पाहत होते. लग्न आटोपल्यानंतर याच लग्नात उपस्थित असलेले सोमनाथ रंगनाथ हारेर, बंडूपंत रंगनाथ हारेर व संतोष गंगाधर हारेर यांनी खोसपुरी येथे हरिभाऊ यांच्या घरी जाऊन लग्नात स्वागतासाठी आमचे नाव का घेतले नाही, अशी विचारणा करत मारहाण केली़ या घटनेनंतर हरिभाऊ यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ हरिभाऊ यांनी रुग्णालयातून दिलेल्या जबाबावरून सोमनाथ, बंडूपंत व रंगनाथ हारेर यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ गुन्हा दाखल होऊनही आरोपींविरोधात काहीच कारवाई होत नसल्याने हरिभाऊ यांनी अधीक्षकांना निवेदन दिले आहे़ संबंधित आरोपी पोलिसात तक्रार केली म्हणून वारंवार जीवे मारण्याची धमकी देत आहे. सदर आरोपींची पार्श्वभूमी गुंड प्रवृत्तीची असून, यापूर्वी देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Did not get the name: The announcer at the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.