आरक्षणासाठी नेवासा येथे धनगर समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 02:59 PM2018-08-14T14:59:17+5:302018-08-14T14:59:21+5:30

धनगर समाजास अनुसूचित जमाती आरक्षण सवलती त्वरित लागू कराव्यात या मागणीसाठी सकल धनगर समाजाने जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालय मोर्चा काढला.

Dhangar community front in Navarwa for reservation | आरक्षणासाठी नेवासा येथे धनगर समाजाचा मोर्चा

आरक्षणासाठी नेवासा येथे धनगर समाजाचा मोर्चा

Next

नेवासा : धनगर समाजास अनुसूचित जमाती आरक्षण सवलती त्वरित लागू कराव्यात या मागणीसाठी सकल धनगर समाजाने जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालय मोर्चा काढला.
नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यावरील अहिल्याबाई होळकर मंदिर येथे तालुक्यातील धनगर समाज बांधव एकत्र येऊन आरक्षणाच्या प्रमुख मागणी बरोबरच धनगर समाजाला सोई सुविधा उपलब्ध कराव्यात तसेच त्यासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करावी, शेळ्या- मेंढ्या चरण्यासाठी चराऊ कुरणे उपलब्ध करावी. धनगर समाजाच्या मुला- मुलींसाठी तालुका स्थरावर स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावी. शेळी- मेंढी विकास महामंडळास आर्थिक बजेटमध्ये तरतूद करावी. आरक्षणसंदर्भात दाखल झालेले गुन्हे विनाअट मागे घ्यावेत. या मागणीसाठी सकाळी ११ वाजता यळकोट..यळकोट जय मल्हार च्या जोरदार घोषणा देत नगरपंचायत चौक, नाथबाबा चौक येथून मोर्चा तहसील कार्यालय येथे पोहचला. तहसील कार्यालय येथे निवेदनाचे वाचन करण्यात आले व तहसीलदार उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शशिकांत मतकर, अशोक कोळेकर, सोपान भगत,नामदेव खंडागळे, अरुण नजन, भाऊसाहेब काळे, संतोष मिसाळ, भाऊसाहेब राशीनकर, बाळासाहेब भुसारी, संपतराव बुळे, एकनाथ धनापुणे, बाबा गवळी, किशोर विखे, राजहंस मंडलिक, भाऊराव नगरे, अशोक मिसाळ, बाबासाहेब भगत, ज्ञानेश्वर देवकाते यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

Web Title: Dhangar community front in Navarwa for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.