अतिक्रमण केलेल्या सदस्याचे पद रद्द करण्याची मागणी : भाजपच्या तालुकाध्यक्षांनी केली तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 04:03 PM2018-10-23T16:03:56+5:302018-10-23T16:03:59+5:30

नगर तालुक्यातील वाळकी गावात तीन ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण केल्याने त्यांचे सदस्यपद रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष दिलीप भालसिंग व युवक नेते रामदास भालसिंग यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

Demanding to cancel the post of encroachment member: BJP's Talukas have filed a complaint | अतिक्रमण केलेल्या सदस्याचे पद रद्द करण्याची मागणी : भाजपच्या तालुकाध्यक्षांनी केली तक्रार

अतिक्रमण केलेल्या सदस्याचे पद रद्द करण्याची मागणी : भाजपच्या तालुकाध्यक्षांनी केली तक्रार

Next

केडगाव : नगर तालुक्यातील वाळकी गावात तीन ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण केल्याने त्यांचे सदस्यपद रद्द करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष दिलीप भालसिंग व युवक नेते रामदास भालसिंग यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
वाळकी गावचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य देविदास कासार यांनी गावठाण हद्दीतील गट नंबर ६७४/१ मध्ये मुलाच्या व्यवसायासाठी अतिक्रमण करून गाळा बांधकाम केले असल्याची तक्रार भालसिंग यांनी केली आहे.
नसीमा सलीम शेख यांनी व सोनल श्रीराम नाईक यांनी मिळकत क्रमांक ६६३ मध्ये ग्रामपंचायत जागेवर अनाधिकराने कब्जा केला आहे. नसीमा शेख या जागेचा वापर निवासी कारनासाठी तर नाईक यांनी व्यवसायासाठी अनधिकाराने व्यापारी गाळयाचे बांधकाम केले आहे. आपल्या पदाचा गैर वापर करून या मिळकती वापरून त्यानी नियमांचे उल्लंघण केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी केली आहे.
शासनाच्या नवीन नियमानुसार ग्रामपंचायत जागेवर सदस्य अथवा त्याच्या कुटुंबाचे अतिक्रमण असल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होते. या नियमाचा तालुक्यात प्रथमच सर्वात मोठ्या वाळकी ग्रामपंचायतीत आधार घेण्यात आला आहे.

आम्ही कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केलेले नाही. जो गाळा वापरतो तो ग्रामपंचायतीचा असून त्याचे डिपॉझिट व मासिक भाडे ही भरतो. तरीही तक्रार का करण्यात आली हे समजले नाह . राजकीय विरोधामुळे तक्रार केली असावी.
- देविदास कासार ( ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच)

Web Title: Demanding to cancel the post of encroachment member: BJP's Talukas have filed a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.