कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण; 29 नोव्हेंबरला दोषींच्या शिक्षेचा होणार फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:34 PM2017-11-22T12:34:09+5:302017-11-22T14:57:59+5:30

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींनी अमानुष कृत्य केलेले असल्याने त्यांना फाशीची शिक्षाच योग्य राहील, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी न्यायालयात केला. दोषींना २९ नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

Death sentence awarded to convicts in the Kopardi case; The argument of special public prosecutor Ujjwal Nikam | कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण; 29 नोव्हेंबरला दोषींच्या शिक्षेचा होणार फैसला

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण; 29 नोव्हेंबरला दोषींच्या शिक्षेचा होणार फैसला

Next
ठळक मुद्देयुक्तिवादामध्ये निकम यांनी इंदिरा गांधींची हत्या व संसदेवरील हल्ल्याच्या खटल्याचे दाखले दिले. संसदेवरील हल्ल्यात अफजल गुरुने कट केला, म्हणून त्यालाही न्यायालयाने दोषी धरले होते. कटातील आरोपीला शिक्षा देऊ नये, असा कुठलाही नियम नाही. संतोष भवाळ व नितीन भैलुमे हे बलात्कार व खुनाच्या कटात सहभागी असल्यामुळेच मुख्य दोषी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे या तिघांनाही फाशी दिली जावी, अशी मागणी निकम यांनी केली.

अहमदनगर : कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींनी अमानुष कृत्य केलेले असल्याने त्यांना फाशीची शिक्षाच योग्य राहील. कोपर्डी खटल्यातील दोन दोषी हे प्रत्यक्ष बलात्काराच्या घटनेत सहभागी नसले, तसा पुरावा नसला तरी ते या घटनेच्या कटात सहभागी असल्याने ते मुख्य दोषीसह फाशीच्या शिक्षेस पात्र आहेत, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केला. दोषींना २९ नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

सरकारी पक्षाच्यावतीने युक्तिवाद करतान निकम म्हणाले, ११ ते १३ जुलै २०१६ दरम्यान बलात्कार व हत्येचा कट दोषींनी रचला. ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता पीडित मुलगी व तिच्या मैत्रीणीला रस्त्यात अडविले. दोषी क्रमांक एक जितेंद्र शिंदे याने पीडित मुलीचा हात खेचला.  बलात्काराच्या उद्देशाने रस्त्याच्या कडेला नेले. दोषी नितीन भैलुमे व संतोष भवाळ हे त्यावेळी विकट हास्य करत जितेंद्र शिंदेच्या कृत्याचा आनंद लुटत होते. त्यावेळी दोघांनीही जितेंद्र शिंदेला नंतर काम उरकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दोन दिवस पीडितेवर जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे, संतोष भवाळ हे पाळत ठेवत होते. पीडित मुलगी १३ जुलैला सायंकाळी ७ वाजता पीडित मुलगी मसाला आणण्यासाठी जात होती. पीडित मुलगी परत न आल्याने आई-वडिलांनी शोध घेतला. त्यावेळी रस्त्याच्या कडेला सायकल दिसली. त्यावेळी शेतातच मुलीचे प्रेत सापडले. मुलीचे हात निखळून पडले, गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती. दोषींनी नियोजनपूवर्क ही हत्या केली. यात जितेंद्र शिंदेला नितीन भैलुमे, संतोष भवाळ यांनी साथ दिली, असे सांगत निकम यांनी तिघांनाही फाशीची शिक्षाच योग्य राहील, असे सांगितले. 

युक्तिवादामध्ये निकम यांनी इंदिरा गांधींची हत्या व संसदेवरील हल्ल्याच्या खटल्याचे दाखले दिले. इंदिरा गांधीच्या हत्येमध्ये दोन अंगरक्षक सहभागी होते. तिसरा आरोपी तेहरसिंग हा घटनास्थळी नव्हता. मात्र, तो कटात सहभागी असल्याने त्यालाही फाशीची दिली होती. संसदेवरील हल्ल्यात अफजल गुरुने कट केला, म्हणून त्यालाही न्यायालयाने दोषी धरले होते. कटातील आरोपीला शिक्षा देऊ नये, असा कुठलाही नियम नाही. त्यामुळे कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणात संतोष भवाळ व नितीन भैलुमे हे बलात्कार व खुनाच्या कटात सहभागी असल्यामुळेच मुख्य दोषी जितेंद्र शिंदे याच्यासह संतोष भवाळ व नितीन भैलुमे या दोघांनाही फाशी दिली जावी, अशी मागणी निकम यांनी केली. संतोष भवाळ याच्या वतीने बाळासाहेब खोपडे यांनी युक्तिवाद केला़ दोषी हा घटनेत सहभागी असल्याचा कोणताही पुरावा न्यायालसमोर नाही़ तसेच ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना नाही. त्यामुळे आरोपीस फाशी देण्याइतका पुरावा नसल्यामुळे आरोपीस फाशी देऊ नये, अशी मागणी खोपडे यांनी केली. दोषींना २९ नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 

भवाळने मागितली कमी शिक्षा

संतोष भवाळ याने मला ४ व ६ वर्षाच्या दोन मुली आहेत. चौथीत शिकणारा मुलगा आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर असल्याने न्यायालयाने मला कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.

Web Title: Death sentence awarded to convicts in the Kopardi case; The argument of special public prosecutor Ujjwal Nikam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.