ख्वाडाफेम भाऊराव क-हाडेच्या बबनला सेन्सॉरचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:05 AM2017-12-16T11:05:57+5:302017-12-16T11:12:34+5:30

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक भाऊराव क-हाडे याचा बबन हा चित्रपट २९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता़ मात्र, सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे़

Danga of Babnan Sensor of Khwadefam Bhaurao Kadam | ख्वाडाफेम भाऊराव क-हाडेच्या बबनला सेन्सॉरचा दणका

ख्वाडाफेम भाऊराव क-हाडेच्या बबनला सेन्सॉरचा दणका

googlenewsNext
ठळक मुद्देचित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर

अहमदनगर : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक भाऊराव क-हाडे याचा बबन हा चित्रपट २९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता़ मात्र, सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे़.
भाऊराव क-हाडेचे शिक्षण नगरच्या न्यू आर्टस् महाविद्यालयात झाले. श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी या छोट्याशा खेड्यातून आलेल्या भाऊराव क-हाडेने ख्वाडा या कलात्मक चित्रपटाची निर्मिती केली़. त्यासाठी त्याने स्वत:ची जमीन विकली़ लाखो रुपयांचे कर्ज काढले आणि ख्वाडा चित्रपट बनविला़ चित्रपट समिक्षक, प्रेक्षक सर्वांनीच ख्वाडा चित्रपटाचे कौतुक केले़. ख्वाडा चित्रपटाने बॉक्स आॅफिसवरही चांगला गल्ला जमविला़. अनेक पुरस्कारांवर मोहोर उमटविली़. या चित्रपटासाठी भाऊरावला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला़. त्यानंतर भाऊराव क-हाडेने ‘बबन’ या चित्रपटाची निर्मिती केली़. हा चित्रपट २९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता़ मात्र, सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे़. चित्राक्ष फिल्मची निर्मिती असलेला ‘बबन’ कधी प्रदर्शीत होणार आहे, या प्रश्नावर उत्तर देताना भाऊराव क-हाडे याने चित्रपटाचे प्रदर्शन लांबल्याचे सांगितले़ मात्र, प्रदर्शनाची तारिख कधी असेल, यावरही भाऊराव क-हाडेने मौन बाळगले आहे़.

Web Title: Danga of Babnan Sensor of Khwadefam Bhaurao Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.