Councilors removed three officers from the meeting of the municipal corporation | अहमदनगर मनपाच्या सभेतून नगरसेवकांनी तीन अधिका-यांना हाकलले

ठळक मुद्देपथदिव्यांच्या घोटाळ््यातील अधिका-यांची होणार चौकशीमहापौर सुरेखा कदम यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शहरातील पथदिव्यांची कामे न करताच मुख्य लेखा परिक्षकांच्या बनावट सहिने तब्बल ४० लाख रुपयांची बिले अदा केल्याचा प्रकार शुक्रवारी महापालिकेच्या सभेत उघडकीस आला होता. त्यामुळे आज सभा सुरु झाल्यानंतर नगसेवकांनी गोंधळ घालत संबधित अधिका-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत महापालिकेच्या सभेतून तीन अधिका-यांना हाकलत बाहेर काढले. त्यानंतर महापौर सुरेखा कदम यांनी संबधित अधिका-यांची चौकशी करुन निलंबन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. शुक्रवारी महानगरपालिकेच्या सभेत विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी ४० लाख रुपयांचा घोटाळा उघड केला होता. शहरातील प्रभाग क्रमांक १ आणि २८ मध्ये पथदिव्यांची कामे न करताच मुख्या लेखा परिक्षकांच्या बनावट सहिने ४० लाख रुपये ठेकेदाराला अदा करण्यात आले असल्याचा प्रकास काल उघडकीस आला. त्यानंतर आज सकाळीच शहरात पथदिवे उभारणीस सुरुवात झाली. कालच्या सभेत याबाबत कामे झाल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात आज कामाला सुरुवात झाली. काही ठिकाणी ठेकेदाराने रात्रीतून साहित्य आणून टाकले. आज महापालिकेची सभा गोंधळातच सुरु झाली. या घोटाळ््याप्रकरणी संबधित अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करत निलंबनाची मागणी नगरसेवकांनी केली. संतप्त नगसेवकांनी तीन अधिका-यांनी सभागृहाबाहेर हाकलले. त्यानंतर पथदिव्यांच्या घोटाळ््यातील संबधित अधिका-यांची चौकशी करुन निलंबित करण्याचे आदेश महापौर सुरेखा कदम यांनी प्रशासनाला दिले. मात्र त्यावरही नगरसेवकांचे समाधान न झाल्याने गोधंळ सुरुच राहिला. त्यामुळे सभा तहकूब करण्यात आली. बुधवारी ३ जानेवारी २०१८ रोजी बैठक पुढे सुरु होणार आहे.