नगरसेवकांनी ठरवली राठोड यांची उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:54 PM2019-06-10T12:54:09+5:302019-06-10T12:55:15+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी शिवसेनेच्या नगरसेवकांची चितळे रोडवरील शिवालयात बैठक झाली. उपस्थित नगरसेवकांनी एकमताने अनिल राठोड यांच्याच नावाला संमती दिली

Corporators decide the candidacy of anil Rathod | नगरसेवकांनी ठरवली राठोड यांची उमेदवारी

नगरसेवकांनी ठरवली राठोड यांची उमेदवारी

Next

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी शिवसेनेच्या नगरसेवकांची चितळे रोडवरील शिवालयात बैठक झाली. उपस्थित नगरसेवकांनी एकमताने अनिल राठोड यांच्याच नावाला संमती दिली. यावेळी इतर नगरसेवकांनी त्यांच्या समर्थकांना आवर घालावा, असा सल्लाही शहरप्रमुखांनी दिला. दरम्यान राठोड हेच विधानसभेचे उमेदवार असतील, आपण निवडणूक लढविणार नाही, असे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनी बैठकीत जाहीर केले.
विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच पक्षांना लागले आहेत. त्यात उतावीळ कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या नावाने ‘भावी आमदार’ म्हणून पोस्ट व्हायरल केल्या आहेत. शनिवारी सकाळी शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांच्या समर्थकांनी ‘भावी आमदार’ अशा पोस्ट व्हायरल करून एकच खळबळ उडवून दिली. त्यामुळे शिवसेनेच्या वर्तुळात चर्चेला उधाण आले. त्या पार्श्वभूमीवर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी रविवारी सकाळी तातडीने बैठक घेतली. या बैठकीला सर्व नगरसेवक, नगरसेविकांचे पतीराज उपस्थित होते. यावेळी सर्वांनी अनिल राठोड हेच विधानसभेचे पक्षाचे उमेदवार असतील, यावर शिक्कामोर्तब केले. आता कोणीही यापुढे दावा सांगणार नाही. नगरसेवकांनी आपापल्या कार्यकर्त्यांना आवर घाला, असा सबुरीचा सल्लाही बैठकीत देण्यात आला. बैठकीच्या सुरवातीलाच संभाजी कदम यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी पोस्ट व्हायरल केल्या होत्या. विधानसभा निवडणूक लढविणार नसून अनिल राठोड हेच आमचे उमेदवार असतील, असेही कदम यांनी सांगितले.
राठोड हेच विधानसभेचे उमेदवार असतील, यावर सर्व नगरसेवकांचे एकमत झाले. शिवसेनेची उमेदवारी ही मातोश्रीवरून ठरते. राठोड यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार आहे, यात काहीही शंका नाही. तरीही खबरदारी म्हणून सेनेचे सर्व नगरसेवक पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राठोड यांनाच उमेदवारी देण्यासाठी साकडे घालणार आहेत, असे बैठकीत ठरले.

शिवसेनेचे शहरप्रमुख पद हे शहरात महत्त्वाचे मानले जाते. राठोड यांच्या विश्वासातील व्यक्तीच शहरप्रमुख होते. यापूर्वी संभाजी कदम शहरप्रमुख होते. पत्नी महापौर झाल्यानंतर त्यांना पदाचा त्याग करावा लागला. सध्या कदम यांच्याकडे कोणतेही पद नाही. शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या कामगिरीवर राठोड खूश आहेत. अडीच वर्षात महापौर सेनेचा असूनही विकासाचा वाटा प्रभागात न आल्याने नगरसेवकांची नाराजी होती.

Web Title: Corporators decide the candidacy of anil Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.