अतिक्रमणांच्या विळख्यात हरविलेल्या नगर शहरातील नगर-पुणे महामार्गाने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 01:44 PM2018-01-09T13:44:58+5:302018-01-09T13:46:31+5:30

नगर शहरातील नगर-पुणे महामार्गावरील इम्पीरिअल चौक ते मार्केट यार्ड चौक या दरम्यानची सर्व अतिक्रमणे महापालिकेने पोलीस बंदोबस्तात हटविली असून, रेल्वे स्टेशनपर्यंतची अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.

The city lost in the ruin of encroachment by the city-Pune highway | अतिक्रमणांच्या विळख्यात हरविलेल्या नगर शहरातील नगर-पुणे महामार्गाने घेतला मोकळा श्वास

अतिक्रमणांच्या विळख्यात हरविलेल्या नगर शहरातील नगर-पुणे महामार्गाने घेतला मोकळा श्वास

Next

अहमदनगर : नगर शहरातील नगर-पुणे महामार्गावरील इम्पीरिअल चौक ते मार्केट यार्ड चौक या दरम्यानची सर्व अतिक्रमणे महापालिकेने पोलीस बंदोबस्तात हटविली असून, रेल्वे स्टेशनपर्यंतची अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत.
मंगळवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने महामार्गालगतचे अतिक्रमण हटविण्याची मोहिम हाती घेतली. अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या कर्मचा-यांनी अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ केला. पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटविली जात आहेत.

जवळपास महिनाभरानंतर महापालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात नगर-पुणे महामार्ग व रेल्वेस्टेशनपर्यंतची अतिक्रमणे हटविली जाणार आहेत. त्यानुसार मंगळवारी इम्पीरिअल चौक ते मार्केट यार्ड चौकादरम्यानची अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. इम्पीरिअल चौक ते मार्केट यार्ड चौक हा अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला होता. टपरीधारकांनी थेट महामार्गावरच टप-या मांडल्या होत्या. अतिक्रमणविरोधी पथकाने या टप-या मंगळवारी हटविल्या.

Web Title: The city lost in the ruin of encroachment by the city-Pune highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.