In the city of Kopargaon, a stolen property worth Rs. 1,58,000 | कोपरगाव शहरात जबरी चोरी : १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास
कोपरगाव शहरात जबरी चोरी : १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लंपास

कोपरगाव : शहरातील श्रध्दा नगरी परिसरातील बंद घराचा कडी कोयंडा तोडून सोन्याच्या दागिण्यांसह रोख रक्कम असा १ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.
श्रध्दा नगरी कॉलनीतील राहणारे गालट हे घराला कुलूप लावून कामावर गेले होते. कोपरगाव नगरपालिका सुवर्ण जयंती विभागात काम करणारे महारुद्र विठ्ठल आप्पा गालट हे घरी जेवायला आले असता घराच्या समोरील दरवाजाचा कडी कोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील कपाटातील ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. यात २० हजार किंमतीचे दोन दिड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, २५ हजार रुपयांचे चार प्रत्येकी अर्धा सोन्याचे अंगठ्या, पाच हजाराच्या अर्धा तोळा कानातील रिंगा, पाच हजाराच्या प्रत्येकी अर्धा ग्रॅमच्या आठ अंगठ्या, तीन चांदीचे पैजन, दोन कंबरेच्या साखळ्या, एक कंबरेचा चांदीचा आकडा असे एकुण पाच भाराचे दोन हजाराचे चांदीचे दागिने व रोकड ३ हजार असे ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी महारुद्र आप्पा गालट यांच्या फियार्दीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Web Title: In the city of Kopargaon, a stolen property worth Rs. 1,58,000
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.