‘लोकमत’च्या आॅनलाइन वृत्तानंतर छिंदमचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 06:18 PM2018-02-17T18:18:46+5:302018-02-17T18:21:13+5:30

आक्षेपार्ह विधान करून २४ तास उलटले, तरी उपमहापौरपदाचा राजीनामा महापौरपदापर्यंत पोहोचलाच नव्हता. दरम्यान याबाबत लोकमतच्या वेबसाईटवर याबाबत वृत्त प्रकाशित होताच भाजपामध्ये एकच खळबळ उडाली आणि दुपारी साडेतीनवाजता छिंदम याचा राजीनामा महापौरांकडे पाठविण्यात आला.

 Chhatham resigns after Lokmat's online report | ‘लोकमत’च्या आॅनलाइन वृत्तानंतर छिंदमचा राजीनामा

‘लोकमत’च्या आॅनलाइन वृत्तानंतर छिंदमचा राजीनामा

Next

अहमदनगर : भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन श्रीपाद छिंदम याच्याकडून उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र आक्षेपार्ह विधान करून २४ तास उलटले, तरी उपमहापौरपदाचा राजीनामा महापौरपदापर्यंत पोहोचलाच नव्हता. दरम्यान याबाबत लोकमतच्या वेबसाईटवर याबाबत वृत्त प्रकाशित होताच भाजपामध्ये एकच खळबळ उडाली आणि दुपारी साडेतीनवाजता छिंदम याचा राजीनामा महापौरांकडे पाठविण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या उपमहापौर श्रीपाद छिंदम याची शुक्रवारी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. तसेच त्याच्या उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे खा. दिलीप गांधी यांनी जाहीर केले होते. छिंदम याने दिलेल्या राजीनाम्याची प्रतही माध्यमांकडे पाठविण्यात आली होती. मात्र छिंदम याने पदाचा राजीनामा दिला असल्याचे शहर जिल्हाध्यक्षांना पत्र लिहिले आहे. प्रत्यक्षात छिंदम याने महापौरांच्या नावे राजीनामा सादर करणे आवश्यक होते. छिंदम याने दिलेला पदाचा राजीनामा प्राप्त झाला नसल्याचे महापौर सुरेखा कदम यांनी शुक्रवारी रात्री सांगितले होते. २४ तास उलटून गेल्यानंतरही शनिवारी महापालिकेत राजीनामा धडकलाच नाही. याचे सविस्तर वृत्त लोकमतने आॅनलाइन प्रकाशित केल्यानंतर खासदार गांधी यांनी छिंदम याचा राजीनामा महापौर सुरेखा कदम यांच्या कार्यालयाकडे पाठवून दिला. दरम्यान महापौर नगरमध्ये नसल्यामुळे या राजीनाम्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

Web Title:  Chhatham resigns after Lokmat's online report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.