छिंदम म्हणतो, मी राजीनामा दिलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:22 AM2018-07-24T11:22:04+5:302018-07-24T11:22:48+5:30

: उपमहापौर पदाचा मी राजीनामा दिलाच नाही़ महापालिकेत दिलेला राजीनामा खोटा असून त्यावरील स्वाक्षरीही माझी नाही़ या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्रीपाद छिंदम याने तोफखाना पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी महापालिकेला पत्र देऊन या राजीनामा प्रकरणाची माहिती मागितली आहे.

Chhandam says, I will not resign | छिंदम म्हणतो, मी राजीनामा दिलाच नाही

छिंदम म्हणतो, मी राजीनामा दिलाच नाही

Next
ठळक मुद्देफसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी: शिवाजी महाराजांबद्दल काढले होते अपशब्द

अहमदनगर : उपमहापौर पदाचा मी राजीनामा दिलाच नाही़ महापालिकेत दिलेला राजीनामा खोटा असून त्यावरील स्वाक्षरीही माझी नाही़ या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्रीपाद छिंदम याने तोफखाना पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी महापालिकेला पत्र देऊन या राजीनामा प्रकरणाची माहिती मागितली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्याप्रकरणी छिंदम याच्या विरोधात नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त झाला होता. याप्रकरणी त्याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची तीव्रता वाढल्यानंतर खासदार तथा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी छिंदम याची पक्षातून हकालपट्टी करत त्याचा उपमहापौर पदाचा राजीनामा घेतला असल्याचे जाहीर केले होते. छिंदम याला जामीन मिळाल्यानंतर तो नगर शहरात आला.  कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणामुळे पोलिसांनी त्याला दोनवेळा शहरातून हद्दपार केले होते. आता राजीनाम्याविषयी छिंदमने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पुन्हा नवीन चर्चा सुरू झाली आहे. छिंदम याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी अटकेत असताना माझा राजीनामा पालिकेत गेला कसा? या प्रकरणाची सखोल चौकशी करून राजीनामापत्र लिहून त्याच्यावर खोटी स्वाक्षरी करणाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असे त्याने म्हटले आहे. छिंदमने तक्रार अर्ज दिल्यानंतर महापालिकेला पत्र देऊन राजीनाम्यासंदर्भात माहिती मागितली असल्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी सांगितले.
छिंदमच्या निशाण्यावर नेमके कोण?
श्रीपाद छिंदम याची पक्षातून हकालपट्टी करुन त्याचा उपमहापौर पदाचा राजीनामा घेतल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते.आता मात्र, छिंदमने पलटी मारत तो राजीनामाच खोटा असून, त्यावरील सहीही माझी नसल्याचे पोलिसांना लेखी दिले आहे.

एव्हढेच नव्हे तर या प्रकरणातील दोषींवर गुन्हा नोंदविण्याची मागणी त्याने पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे छिंदमच्या निशाण्यावर भाजपमधील नेमका कोण नेता आहे,याबाबत शहरात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

छिंदमनेच दिला होता राजीनामा - गांधी
श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द काढल्यानंतर त्याची पक्षातून मी हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यानेच उपमहापौरपदाचा राजीनामा आणून दिला होता. त्यामुळे मी पत्रकार परिषदेत तसे पत्रकारांना सांगितले होते, असे खासदार दिलीप गांधी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Chhandam says, I will not resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.