कर्डिले समर्थक आणि महाआघाडीत खडाजंगी ! : नगर तालुका खरेदी विक्री संघाची सभा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 05:48 PM2018-09-22T17:48:15+5:302018-09-22T17:48:21+5:30

नगर तालूका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाची जुनी इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधण्याच्या मुद्द्यावरून महाआघाडीचे नेते आणि आमदार शिवाजी कर्डीलेंसह सत्ताधारी गटाचे नेते यांच्यात चांगली खडाजंगी झाली.

Chardley supporters : Meeting of City Taluka Purchase Team | कर्डिले समर्थक आणि महाआघाडीत खडाजंगी ! : नगर तालुका खरेदी विक्री संघाची सभा 

कर्डिले समर्थक आणि महाआघाडीत खडाजंगी ! : नगर तालुका खरेदी विक्री संघाची सभा 

Next

केडगाव : नगर तालूका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाची जुनी इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधण्याच्या मुद्द्यावरून महाआघाडीचे नेते आणि आमदार शिवाजी कर्डीलेंसह सत्ताधारी गटाचे नेते यांच्यात चांगली खडाजंगी झाली. पण सभा अर्धवट सोडून गेलेल्या महाआघाडीच्या नेत्यांचा आमदार कर्डीले यांनी समारोपाच्या भाषणात चांगलाच समाचार घेतला .
नगर तालुका खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खरेदी विक्री संघाच्या इमारतीमध्ये आज पार पडली. या सभेसाठी सत्ताधारी गटाकडून आमदार शिवाजीराव कर्डीले तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन रोहीदास मगर, संभाजी पवार , श्रीकांत जगदाळे, ज्ञानदेव शेळके, सुरेश सुंबे, तुकाराम वाघुले, अंबादास बेरड, यांसह बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, संचालक संदीप कडीर्ले, तर महाआघाडीचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे,प्रताप शेळके, गोविंद मोकाटे, पंचायत समिती सदस्य रविंद्र भापकर, व्ही.डी. काळे, डॉ. दिलीप पवार, गुलाब शिंदे, प्रविण कोकाटे , कैलास लांडे आदी उपस्थित होते. या सभेत तालुका खरेदी विक्री संघाची जुनी इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधावी. त्यामुळे तालुका संघाचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विषय चर्चेत आला. यामुळे महाआघाडीच्या नेत्यांनी सत्ताधा-यांना धारेवर धरले. जुनी इमारत का पाडायची, त्या ठिकाणी असणा-या गाळे धारकांचे करार अजून संपेलले नाही त्यांचे काय, त्यांच्या अनामत रकमेचे काय, तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याचे काय यांसह अनेक प्रश्नांवरून महाआघाडी आणि आमदार कर्डीले यांसह सत्ताधारी भाजपा नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. महाआघाडीच्या नेत्यांचे वाढलेले आवाज पाहून म्हणणे थोडक्यात व शांत मांडा पण जोरात बोलू नका असा इशाराही आमदार कर्डीले यांनी दिला. आम्ही शेतकरी असून या संघाचे सभासद आहोत तरी आमचे म्हणणे ऐकले जात नाही. नवीन इमारत बांधून त्यामधील गाळ््यांमध्ये यांना पैसे कमवायचे आहेत. असा आरोप करत महाआघाडीचे नेते सभा अर्धवट सोडून निघून गेले. समारोपाच्या सभेत मात्र आ.कडीर्ले यांनी महाआघाडीच्या नेत्यांचे वाभाडे काढले. विकास घाणून पाडायचा, या ठिकाणी गोंधळ घालून स्वत:चे कपडे फाडून घेत माझ्यावर दहशतीचा आरोप करण्याचा महाआघाडीचा डाव होता, असे कर्डिले यांनी स्पष्ट केले .

‘‘नेप्ती उपबाजार समिती बांधली, कांदा मार्केट तिकडे नेले. त्यावेळीही महाआघाडीने असाच विरोध केला होता. पण तो निर्णय योग्यच होता हे आज दिसून आले आहे. तिकडे जावून आता हे कांद्याचे आंदोलन करत प्रसिद्धी मिळविण्याचा खटाटोप करतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आम्ही बाजार समितीमध्ये बसवला. पण तो आम्ही काढून टाकणार असा प्रचार करत लोकांच्या मनात विष कालवण्याचा यांनी प्रयत्न केला. तालुका संघाच्या नवीन इमारतीमुळे संघाचे उत्पादन वाढणार आहे. यातील काहींनी संघाच्या मालकीचे पत्रे, सिमेंट आणि पाईप नेलेले आहेत. तालूका संघाचे वाटोळे झाले पाहीजे आणि पुन्हा आमच्यावर आरोप करता आले पाहीजेत यासाठी यांचा खटाटोप सुरू असून प्रसिद्धी मिळविण्यासाठी हे सगळे चालले आहे. ’’
- आमदार शिवाजी कर्डीले



‘‘तालुका संघाची इमारत ही शासकीय निधीतून बांधलेली आहे ती पाडता येते का. त्या गाळे धारकांचे पूवीर्चे करार आहेत ते अजून संपलेले नाहीत. त्याचे ३२ ते ३३ लाख डिपॉझीट संघाकडे जमा आहेत, त्याचे काय? इमारत पाडताना बांधकाम विभागाच्या स्ट्रक्चरल आॅडीटरकडून पाहणी अहवाल घ्यावा लागतो. तो घेतलेला नाही. महानगर पालिकेचे अधिकारी बल्लाळ यांना दडपशाही करून अहवाल घेतला आहे. बाजार समितीमध्ये जे घोटाळे यांनी केलेत तेच आता संघात करणार आहेत.
-संदेश कार्ले,सदस्य, जिल्हा परिषद

Web Title: Chardley supporters : Meeting of City Taluka Purchase Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.