The candidates presented the first phase expenses | उमेदवारांनी केला पहिल्या टप्प्यातील खर्च सादर
उमेदवारांनी केला पहिल्या टप्प्यातील खर्च सादर

अहमदनगर : निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आतापर्यंत केलेल्या दैनंदिन खर्चाची पहिल्या टप्प्यातील तपासणी पूर्ण झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील तपासणी बुधवारी होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील खर्च १३ एप्रिल रोजी सादर करण्याच्या सूचना उमेदवारांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उमेदवारांनी १० एप्रिलपर्यंत केलेला खर्च सादर केला. यात सर्वाधिक खर्च भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी १४ लाख ५६ हजार ८३० रूपये दाखवला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी ५ लाख ४२ हजार ५१२ रूपये दाखवला आहे. त्यानंतर इतर पक्ष व अपक्षांचा खर्च साधारण १५ हजार ते ५० हजारांपर्यंत आहे. यातील काही उमेदवारांच्या खर्चाच्या लेख्यांमध्ये तफावत आढळल्याने त्यांना निवडणूक आयोगाने नोटिसा पाठवल्या आहेत.
शिर्डी मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची तपासणी १८, २२ व २६ एप्रिल अशा तीन टप्प्यात होणार आहे.

उमेदवारांनी सादर केलेला खर्च (१० एप्रिलपर्यंत)
नामदेव वाकळे ........................ २७ हजार ६११
डॉ. सुजय विखे ............... १४ लाख ५६ हजार ८३०
संग्राम जगताप ............... ५ लाख ४२ हजार ५१२
कलीराम पोपळघट......................... २५ हजार ८००
धीरज बताडे .............................. १४ हजार ६३०
फारूख शेख................................... अनुपस्थित
सुधाकर आव्हाड.......................... २९ हजार ८१९
संजय सावंत................................. २५ हजार ७००
अप्पासाहेब पालवे....................... २५ हजार ८००
कमल सावंत................................. ७९ हजार ७३५
दत्तात्रय वाघमोडे .............................. अनुपस्थित
भास्कर पाटोळे ............................. १५ हजार ९८७
रामनाथ गोल्हार............................ २६ हजार ५४२
शेख अबीद हुसेन.......................... ३१ हजार २२०
साईनाथ घोरपडे .......................... ३३ हजार २४९
ज्ञानदेव सुपेकर............................... अनुपस्थित
संजीव भोर................................. ६३ हजार ४५०
संदीप सकट................................ १९ हजार ३९०
श्रीधर दरेकर................................. ३३ हजार २०


Web Title: The candidates presented the first phase expenses
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.