अहमदनगरमध्ये भाजपच्या स्मार्ट सिटीचा फुगा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 06:39 PM2018-12-10T18:39:03+5:302018-12-10T18:40:06+5:30

सेना-भाजपच्या मातब्बरांचा पराभव : शिवसेना एक क्रमांकवर, तर राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी

The bubble of the BJP's smart city broke out in Ahmednagar | अहमदनगरमध्ये भाजपच्या स्मार्ट सिटीचा फुगा फुटला

अहमदनगरमध्ये भाजपच्या स्मार्ट सिटीचा फुगा फुटला

googlenewsNext

सुदाम देशमुख
अहमदनगर : स्मार्ट सिटी आणि महापौर झाला तर तिनशे कोटी रुपये देण्याच्या आश्वसनांचा फुगा नगरकरांनी मतपेटीच्या माध्यमातून फोडला. केडगाव हत्याकांडानंतर नगरला भयमुक्त करण्याचा नारा देणा-या शिवसेनेलाच मतदारांनी कौल दिला. पहिल्या क्रमांकावर राहण्याची शिवसेनेने आपली परंपरा कायम राखली.
महापालिकेसाठी रविवारी मतदान झाले. गत पंचवार्षिकपेक्षा चार ते पाच टक्क्यांनी मतदान कमी झाले होते. कमी मतदानाचा अर्थातच भाजपला फटका बसला. ७२ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले असते तर कदाचित भाजपला त्याचा लाभ झाला असता. मात्र कोणालाही निवडून द्या, शहरात विकास होत नाही, अशी ओरड नागरिकांमधून होते. त्याचा फटका मतदानाच्या माध्यमातून बसला. भाजपने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रचार केला. महापालिका निवडणुकीत भाजप प्रथमच स्वबळावर निवडणूक लढला. त्यामुळे ६८ जागाांवर भाजपने उमेदवार दिले असले तरी त्यासाठी भाजपची दमछाक झाली. भाजपकडे निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार नव्हते. इतर पक्षातील २३ उमेदवार भाजपमध्ये आले. ९ पैकी ७ विद्यमान उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामध्ये फक्त दोनच विद्यमान नगरसेवक निवडून आले, तर चार उमेदवारांना पराभवाचा झटका बसला.
भाजपने संकल्पनामा प्रसिद्ध केला. स्मार्ट सिटीचे वचन दिले, मात्र त्याचा फारसा प्रभाव मतदारांवर पडला नाही. केडगाव हत्याकांडानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार धास्तावले होते. त्यामुळे त्यांनी सुप्तपणे प्रचार केला. शिवसेनेने घरोघरी मतदारांशी थेट संपर्क केला. त्याचा फायदा त्यांना क्रमांक एकपर्यंत घेवून गेला. विकासापेक्षा मतदारांनी शिवसेनेच्या भयमुक्तीला पसंती दिली.

मातब्बरांचा पराभव

भाजपचे महापौरपदाचे उमेदवार सुवेंद्र गांधी, दिप्ती गांधी, किशोर डागवाले, महेश तवले, उषा नलवडे यांचा पराभव झाला. शिवसेनेचे पहिले महापौर भगवान फुलसौंदर आणि शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचाही पराभव झाले. काँग्रेसचे शहराध्यक्ष दीप चव्हाण यांचा पराभव झाला, मात्र त्यांच्या पत्नी शीला चव्हाण निवडून आल्या.

यांचा विजय

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या राष्ट्रवादीतील दोन्ही कन्या विजयी झाल्या. महापौर सुरेखा कदम, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे हे पुन्हा निवडून आले. महापालिकेचे सभापती बाबासाहेब वाकळे (भाजप), सभागृह नेते गणेश कवडे उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या पत्नी पुष्पा बोरुडे, महिला व बालकल्याम समितीच्या सभापती सारिका भूतकर (शिवसेना) हे सर्व निवडून आले.

Web Title: The bubble of the BJP's smart city broke out in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.