निघोजमधील मळगंगा मंदिरात धाडसी चोरी : मुखवट्यासह सोने-चांदीचे दागिने लंपास, गाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 10:08 AM2018-09-01T10:08:35+5:302018-09-01T10:14:21+5:30

राज्यातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा देवीच्या मंदिरातील देवीचा मुख्य चांदीच्या मुखवट्यासह सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबविले.

Bronze stolen in Malganga temple in Nijoj: Lampas with gold and silver jewelery, closing the village | निघोजमधील मळगंगा मंदिरात धाडसी चोरी : मुखवट्यासह सोने-चांदीचे दागिने लंपास, गाव बंद

निघोजमधील मळगंगा मंदिरात धाडसी चोरी : मुखवट्यासह सोने-चांदीचे दागिने लंपास, गाव बंद

Next

निघोज : राज्यातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा देवीच्या मंदिरातील देवीचा मुख्य चांदीच्या मुखवट्यासह सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबविले.
शुक्रवारी रात्री ही घटना घडली. मंदिरापासून अवघ्या ५० ते ६० मीटर अंतरावर निघोज पोलीस चौकी असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळे गावात कडकडीत बंद पाळून चोरीचा तात्काळ तपास करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मंदिरातील सीसीटीव्ही सुरु असून फक्त लाईव्ह दिसते. हार्डडिक्समध्ये बिघाड झालेला आहे. चोरट्यांनी देवीचे  सोने चांदी व दानपेटी चोरली. याशिवाय देवीचा गाभा-यातील  ८ ते १० किलोचा चांदिचा, चांदीची छत्री, एक ते दीड किलो चांदीचा घोडा, नथ यासह किरकोळ सोनेही लंपास केले.  जिल्हा पोलिसअधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Web Title: Bronze stolen in Malganga temple in Nijoj: Lampas with gold and silver jewelery, closing the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.