महापौरपदासाठी भाजपाचे वाकळे, सेनेचे बोराटे तर राष्ट्रवादीचे बारस्कर रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:36 PM2018-12-27T12:36:31+5:302018-12-27T12:39:49+5:30

अहमदनगर :   अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर यांनी ...

BJP's Wakale for the post of Mayor, Senate Borate and NCP's Barker Range | महापौरपदासाठी भाजपाचे वाकळे, सेनेचे बोराटे तर राष्ट्रवादीचे बारस्कर रिंगणात

महापौरपदासाठी भाजपाचे वाकळे, सेनेचे बोराटे तर राष्ट्रवादीचे बारस्कर रिंगणात

googlenewsNext

अहमदनगर :  अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर यांनी अर्ज दाखल केला आहे. 
भाजपाकडून बाबासाहेब वाकळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वाकळे अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौरपदासाठी भाजपाकडून मालनताई ढोणे अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर यांनी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या रुपाली वारे अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे महापौर पदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. आज दुपारी ३ वाजेपर्यत अर्ज दाखल करण्याची मुदत आहेत. तर उद्या(शुक्रवारी) ११ वाजता महापौरपदाची निवडणुक पार पडणार आहे. सेना-भाजप युतीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. 

Web Title: BJP's Wakale for the post of Mayor, Senate Borate and NCP's Barker Range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.