भीमा-कोरेगाव प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद, वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क on Tue, January 02, 2018 12:04pm

नगर जिल्ह्यात मंगळवारी ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला़ नगर शहरात वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर काही भागात दगडफेकही करण्यात आली.

अहमदनगर : सोमवारी पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथे किरकोळ वादातून झालेल्या दगडफेक, तोडफोडीचे पडसाद मंगळवारी नगर जिल्ह्यात उमटू लागले आहेत. नगर जिल्ह्यात मंगळवारी ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला़ नगर शहरात वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर काही भागात दगडफेकही करण्यात आली. भिंगार येथे बंद पाळण्यात आला. नगर शहरातील माळीवाडा येथे काही बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. मार्केट यार्ड, कायनेटिक चौक, माळीवाडा, वाडीयापार्क परिसरात वाहनांवर दगडफेक करण्यात आली. काही तरुणांनी नगर शहरातून दुचाकीवरुन घोषणाबाजी करीत शहरात फिरत व्यावसायिकांना दुकाने बंद करायला लावली. श्रीरामपूरमध्ये बंद पाळण्यात आला असून, शहरात तणाव पसरला आहे. शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. राहाता येथे रास्ता रोको करण्यात आला. ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले आहे.

संबंधित

जामखेड तालुक्याचा भ्रमनिरास : कुकडी प्रकल्पाचा सुधारित आराखडा
रुग्णालयांच्या नावात ‘धर्मादाय’ येईना ..!
अत्याचार रोखण्यासाठी ठोस कार्यक्रमाची आवश्यकता : आमदार निलम गो-हे
नगर तालुक्यात १ लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन
मटका अड्ड्यावर छापा : २६ हजारांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर कडून आणखी

इच्छाशक्तीचा अभाव असल्यानेच लोकायुक्त नियुक्तीकडे दुर्लक्ष : अण्णा हजारे
जामखेड तालुक्याचा भ्रमनिरास : कुकडी प्रकल्पाचा सुधारित आराखडा
अत्याचार रोखण्यासाठी ठोस कार्यक्रमाची आवश्यकता : आमदार निलम गो-हे
नगर तालुक्यात १ लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन
मटका अड्ड्यावर छापा : २६ हजारांचा मुद्देमाल जप्त

आणखी वाचा