सावधान ! या गावचे जावई व्हाल.., तर धोंड्याला मुकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 05:56 PM2018-05-23T17:56:23+5:302018-05-23T17:59:06+5:30

अधिक मास आला की सर्वत्र आपल्या जावयांना धोंड्याचे गोडधोड जेवण देण्यासाठी सासुरवाडीच्या लोकांची लगबग सुरु होते. नवा जावई असला तर त्याची मोठी बडधास्त ठेवली जाते.

Be careful! This will be the son-in-law of this village .., | सावधान ! या गावचे जावई व्हाल.., तर धोंड्याला मुकाल

सावधान ! या गावचे जावई व्हाल.., तर धोंड्याला मुकाल

Next
ठळक मुद्देनगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जेनी गावाने जपली परंपराकाहीतरी दुर्घटना घडते हि भावना या गावक-यांच्या मनात पक्की बसलीजावयांना धोंड्याचे जेवण खाऊ न घालण्याची प्रथा

योगेश गुंड
अहमदनगर : अधिक मास आला की सर्वत्र आपल्या जावयांना धोंड्याचे गोडधोड जेवण देण्यासाठी सासुरवाडीच्या लोकांची लगबग सुरु होते. नवा जावई असला तर त्याची मोठी बडधास्त ठेवली जाते. आमरसाच्या जेवणाबरोबरच नवे कपडे, सोन्याचे दागिने, चांदीची भांडी तसेच इतर उपहार जावयाला देण्याची वषार्नुवर्षे चालत आलेली परंपरा आजही कायम आहे. मात्र नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जेनी हे गाव यासाठी अपवाद ठरत आहे. या गावातील जावयांना धोंडे खाऊ न घालण्याची प्रथा असून आजही ही प्रथा जपली जात आहे.
अहमदनगरपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर पिंपळगाव उज्जेनी या गावाने वषार्नुवर्षे हि परंपरा जतन केली आहे. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातही या गावाने या प्रथेचे कडक पालन केले आहे. गावकरी मोठ्या श्रद्धेने या प्रथेचे पालन करत आहेत हे विशेष. अधिक मास आला कि प्रत्येक सासुरवाडीत आपल्या जावयांना धोंडे खाऊ घालण्याची परंपरा महाराष्ट्रात पाळली जाते. आंब्याचा हंगाम असल्याने या महिन्यात जावई व त्याच्या घरातील लोकांना आमरस व इतर गोडघोड जेवण खाऊ घातले जाते. त्यात जावई नवा असला तर त्याची जास्तच बडधास्त ठेवली जाते. सर्वजण जावयाची खातरदारी करण्यात बीझी असतात. जावयांना जेवणाबरोबर नवे कपडे व आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे इतर उपहार दिले जातात. हीच सर्वत्र परंपरा आहे. मात्र पिंपळगाव उज्जेनी गाव या परंपरेला अपवाद ठरले आहे.
या गावची अधिक मासातील प्रथा नेमकी उलटी आहे. या गावात जावयांना कुणीच धोंड्याचे जेवण खाऊ घालत नाहीत. हि प्रथा कशी पडली व या प्रथेचे नेमके कारणे काय याची माहिती गावातील कोणालाही पक्के सांगता येत नाही, इतकी हि परंपरा जुनी आहे. गावातील लोकांशी चर्चा केल्यानंतर काही बाबी समोर आल्या. गावात कधी काळी कोणीतरी जावयांना अधिक मासात धोंडे खाऊ घातल. आणि जावयाच्या घरी दुर्घटना घडली असा अनुभव जुन्या काळात अनेकांना आला. यामुळे गावक-यांचा पक्का समज झाला कि आपण धोंडे जेवण देण्याच्या प्रथेमुळेच या दुर्घटना घडत आहेत. काहीच्या मते, अधिक मासात जावयांना धोंडे खाऊ घातले आणि गावात रोगराई सुरु झाली. अनेकांचा जीव गेला. यामुळे गावाने अधिक मासात जावयांना जेवण खाऊ न घालण्याची प्रथाच एकमुखाने बंद केली. धोंडे खाऊ घातले कि काहीतरी दुर्घटना घडते हि भावना या गावक-यांच्या मनात पक्की बसली आणि तेथून पुढे या गावाने हि प्रथाच बंद करून टाकली. तेव्हापासून गावातील कोणताच सासरा आपल्या जावयाला अधिक मासात आपल्या घरी धोंडे खायला बोलवत नाही. जावई हि ‘जान है तो जहान है’ म्हणत धोंडे खायचे नावही काढत नाहीत. जेवणासाठी दुर्घटनेची भीती कशाला यामुळे आजपर्यंत हि परंपरा गावात टिकून आहे. परंपरा नेमकी कधीपासून सुरु झाली याची निश्चित माहिती गावातील जुन्या-जाणत्या लोकांनाही सांगता आली नाही. आमच्या आज्यापासून आम्ही हे पाळतो एवढेच जुने लोक सांगतात.

गावातील जावयांना मात्र धोंडे चालतात
पिंपळगाव उज्जेनी गावाचे जे जावई आहेत त्यांच्यासाठी धोंडे खाण्याची प्रथा बंद असली तरी या गावाचे गावकरी ज्या गावाचे जावई आहेत तेथे हि प्रथा असल्याने ते आपल्या सासूरवाडीत धोंडे खाण्यास जाऊ शकतात. म्हणजे धोंडे खाऊ घालण्याची प्रथा नसली तरी धोंडे खाण्याची प्रथा मात्र आहे.

‘‘आमच्या आजोबांनी आम्हाला जावयाला धोंडे न देण्याची गावाची परंपरा असल्याचे सांगितले. त्या काळात जुन्या लोकांचे गांभीर्याने ऐकले जायचे. त्यामुळे आमच्या पिढीने हि परंपरा गावात टिकून ठेवली आहे.आजही आमच्या गावात कोणीच जावयांना धोंडे खाऊ घालत नाहीत.’’ - प्रल्हाद मोरे ( गावकरी)

‘‘आमच्या गावात जावयांना धोंडे खाऊ न घालण्याची जुनी प्रथा आहे. याचे नेमके कारण माहित असले तरी जुन्या काळात या प्रथेमुळे गावात रोगराई पसरून अनेकांचा जीव गेला,असे जुने लोक सांगत होते. यामुळे त्याकाळीच धोंड्याची प्रथा बंद झाली आहे.’’ - जगन्नाथ मगर ( माजी सरपंच)

Web Title: Be careful! This will be the son-in-law of this village ..,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.