कोळपेवाडी दरोड्यातील आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:15 AM2018-10-14T11:15:47+5:302018-10-14T11:15:57+5:30

तालुक्यातील नुकत्याच घडलेल्या कोळपेवाडी दरोड्याची आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला.

Attempts to flee the accused in the Kolpewadi Dock are unsuccessful | कोळपेवाडी दरोड्यातील आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला

कोळपेवाडी दरोड्यातील आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला

googlenewsNext

कोपरगाव : तालुक्यातील नुकत्याच घडलेल्या कोळपेवाडी दरोड्याची आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला.
तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या कारागृहात खोली क्रमांक ३ मध्ये एकूण १७ आरोपी असून त्यातील कोळपेवाडी दरोड्यात अटक असलेल्या आरोपीने रविवारी पहाटे ४ वाजेपूर्वी तेथील शौचाल्याचे भांडे फोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही बाब रक्षकांच्या लक्षात आल्याने आरोपीचा प्रयत्न फसला. या घटनेची माहीती मिळताच वरीष्ठ अधिका-यांनी तात्काळ घाटनास्थळाला भेट देऊन पाहणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. याबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सरू आहे. सध्या या कारागृहात ६९ कैदी असल्याचे समजते.

Web Title: Attempts to flee the accused in the Kolpewadi Dock are unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.