शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा : विरोधकांचा आयुक्तांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 02:12 PM2019-02-22T14:12:30+5:302019-02-22T15:55:24+5:30

शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात या कुत्र्यांचा त्रास होत आहे.

Arrangement of Mokat dogs in the city | शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा : विरोधकांचा आयुक्तांना घेराव

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा : विरोधकांचा आयुक्तांना घेराव

Next

अहमदनगर : शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात या कुत्र्यांचा त्रास होत आहे. अनेक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे, त्यामुळे महापालिका प्रशासनाने यावर उपाययोजना करून त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे यांनी मनपाच्या सभेत केली.
यावेळी नगरसेवक मुद्दसर शेख यांनी प्रभाग १० मध्ये एसटी कॉलनीमध्ये राहणा-या आयुष प्रजापती या मुलास कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये येणारा सर्व खर्च महापालिकेने द्यावा, असे निवेदन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेत आक्रमक आंदोलन
 मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज एका निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागला. यास जबाबदार असणा-या संबंधित आरोग्य अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या निष्क्रिय अधिका-यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महापालिकेत जोरदार आंदोलन करत केली.
वारंवार आंदोलने व मोर्चे काढून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरसेवक करीत आहेत. त्यानंतरही प्रशासनाकडून उपाययोजना न झाल्यामुळे हे प्रकार घडले आहेत. आरोग्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. या प्रकरणी संबंधितावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, संबंधित कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक निखिल वारे, अजिंक्य बोरकर, प्रा.अरविंद शिंदे, सारंग पंधाडे, महेश बुचडे, वैभव ढाकणे सहभागी झाले होते.

Web Title: Arrangement of Mokat dogs in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.