approve the Sankalai water plan before Assembly elections : CM Devendra Fadnavis | विधानसभा निवडणुकीआधी साकळाई आराखड्याला मान्यता देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधानसभा निवडणुकीआधी साकळाई आराखड्याला मान्यता देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अहमदनगर : साकळाई पाणी योजनेचा प्रश्न २५ वर्षापुर्वीचा हा प्रश्न आहे. गेल्या पाच वर्षातील आमची कामे पाहा. गेल्या २५ वर्षातील प्रश्नच आम्ही सोडवत आहेत. त्यामुळे साकळाईचा प्रश्न आम्ही सोडवणारच. विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला पुन्हा तुमच्यात यायचे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांआधी मी साकळाईच्या आराखड्याला मंजुरी देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नगर तालुक्यातील वाळकी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
यावेळी पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, सेनेचे उपनेते अनिल राठोड, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, सेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, जिल्हा परिषद माजी सदस्य बाळासाहेब हराळ, दीपाली सय्यद, समाजसेवक राजाराम भापकर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, कोणी काहीही म्हणो. गेल्या २५ वर्षातील साकळाई प्रश्न विरोधकांनी का सोडला नाही. कर्जत-जामखेडमधील तुकाई आम्हीच केली. साकळाई योजनेमध्ये सुधारणा केली आहे. ओव्हर फ्लोचे पाणी या योजनेतून मिळणार आहे. त्यामुळे कोणाचेही हक्काचे पाणी पळविले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

 

 


Web Title: approve the Sankalai water plan before Assembly elections : CM Devendra Fadnavis
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.