पारनेर (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे संत यादवबाबा मंदिरात बंद खोलीत चर्चा केली.
अण्णांच्या केंद्र सरकारविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाल्याची माहिती आहे. राळेगणसिद्धीत शनिवारी मुख्यमंत्री हे सौरऊर्जा प्रकल्प उद्घाटन व सरपंच मेळाव्यानिमित्त आले होते.
निमित्त मेळाव्याचे असले तरी हजारे यांनी केंद्र सरकारविरोधात लोकपाल व शेतकरी हमीभावासह इतर मागण्यांसाठी दिलेला आंदोलनाचा इशारा गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला महागात पडू शकतो. म्हणून मुख्यमंत्र्यांनीच राळेगणसिद्धीत जाऊन शनिवारी अण्णांशी बंद खोलीत चर्चा केल्याचे समजते. चर्चेचा तपशील समजू शकला नाही.
अण्णांना विचारले असता ते म्हणाले, की सौर ऊर्जा प्रकल्पाचा कार्यक्रम शासकीय होता. मुख्यमंत्री व माझी दिल्लीतील आंदोलनाबाबत काहीही चर्चा झाली नाही. दिल्लीतील आंदोलन फेब्रुवारीमध्ये होईलच.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. त्या तुलनेत मुख्यमंत्री फडणवीस यांचे काम चांगले आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.