हौशी राज्य नाट्य स्पर्धा २०१८: दोन पात्रांमध्ये रंगला छत्रपती शिवरायांचा जिहाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 08:08 PM2018-11-19T20:08:44+5:302018-11-19T20:08:49+5:30

राज्य नाट्य स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी नगर केंद्रावर फिरोज काझी लिखित व दादा नवघरे दिग्दर्शित ‘छत्रपती शिवरायांचा जिहाद’ हे नाटक शेवगावच्या एफ के  क्रिएशन संस्थेने सादर केले.

Amateur State drama competition 2018: Chhatrapati Shivaji's Jihad in color of two characters | हौशी राज्य नाट्य स्पर्धा २०१८: दोन पात्रांमध्ये रंगला छत्रपती शिवरायांचा जिहाद

हौशी राज्य नाट्य स्पर्धा २०१८: दोन पात्रांमध्ये रंगला छत्रपती शिवरायांचा जिहाद

Next

राज्य नाट्य स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी नगर केंद्रावर फिरोज काझी लिखित व दादा नवघरे दिग्दर्शित ‘छत्रपती शिवरायांचा जिहाद’ हे नाटक शेवगावच्या एफ के  क्रिएशन संस्थेने सादर केले. छत्रपतींचा इतिहास कसा चुकीच्या पद्धतीने लिहिला गेला आणि पुढे छत्रपतींना कसे जाती-धर्मापुरते मर्यादीत केले गेले, यावर भाष्य करणारे हे द्विपात्री नाटक. जिहाद म्हटले की कट्टर धर्मांधता, रक्तपात आणि निरापराधींचा बळी असेच चित्र आज आपल्यापुढे उभे राहते. पण जिहाद म्हणजे कोणत्याही धर्माविरुद्ध, कोणत्याही प्रांताविरुद्ध युद्ध नसून, जिहाद म्हणजे चांगल्या कार्यासाठी निस्वार्थी भावनेने सर्वस्व अर्पण करणे, निरापराध जिवितांचे संरक्षण करण्यासाठी, मानव कल्याणासाठी पुकारलेले युद्ध़ मग ते युद्ध वैचारिक असो किंवा सशस्त्ऱ जिहाद हा कोणत्याही धर्मासाठी केला जात नाही, हे शिकविणारे हे नाटक़ या नाटकात छत्रपती शिवरायांची भूमिका फिरोज काझी यांनी तर न्यूज अँकरची भूमिका शीतल परदेशी यांनी साकारली.
न्यूज चॅनलच्या रेकॉर्ड रुममध्ये बातमीपत्र सांगण्यासाठी अँकर येते आणि नाटकाचा पडदा उघडतो़ याच रेकॉर्ड रुममध्ये संपूर्ण नाटक घडते़ छत्रपतींचा महाराष्ट्र जातीय, बलात्कारांच्या घटनांनी पेटला आहे, अशी बातमी न्यूज अँकर सांगत असते. त्याचवेळी चर्रर्र आवाज करीत विद्युत पुरवठा खंडीत होतो़ दरवाजा लॉक होतो़ न्यूज अँकरला बाहेरही पडता येत नाही़ ती बाहेर पडण्यासाठी धडपडते. पण दरवाजा उघडत नाही़ शेवटी ती खुर्चीवर बसून वामकुक्षी घेण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या स्वप्नात छत्रपती शिवाजी महाराज येतात़ रेकॉर्ड रुमची भींत चिरुन त्यातून थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेश होतो़ ती घाबरते़ असं कसं शक्य आहे? पण होय ते छत्रपती शिवाजी महाराजच असतात. न्यूज अँकर छत्रपतींना सद्यस्थितीतल्या महाराष्ट्राचं वर्णन करत प्रश्न विचारते़ त्यातून सुरु होतो दोघांचा संवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या अठरापगड जातीच्या सरदारांचा, त्यांचे युद्ध कोणत्याही धर्माविरोधात नव्हते तर ते स्वराज्यासाठी होते. त्यांनी मोगल, पोर्तुगीज, फे्रंच, डच, इंग्रज अशा अनेकांविरोधात स्वराज्यासाठी लढा दिला. पण इतिहासाने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा हिंदू राजे करुन त्यांना मुस्लिम विरोधी ठरविले, अशी माहिती त्यांच्या संवादातून पुढे येते. शेवटी छत्रपतींचा खरा इतिहास पुढे आणावा आणि तरुणांनी खोट्या इतिहासाला बळी पडू नये, असा संदेश छत्रपती शिवाजी महाराजच देतात आणि नाटकाचा पडदा पडतो.
हे नाटक म्हणजे एका न्यूज चॅनलच्या रेकॉर्डिंग रुममध्ये झालेली हटके मुलाखतच म्हणता येईल़ शीतल परदेशीच्या तोंडून आलेला अफजल खानाचा वध आणि एक मुलीवर होणा-या बलात्काराचे प्रसंग घटनात्मक पद्धतीने दाखविण्यास मोठा वाव होता़ तसे दाखविले असते तर हे नाटक मुलाखत स्वरुपातून बाहेर पडून अधिक रंजक झाले असते. शीतलने वरीलदोन्हीप्रसंगसांगताना अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खिळवून ठेवले. येथे शीतलचा अभिनय निश्चितच कौतुकास्पद ठरला. अंगावर शहारे उभे करणारा तिचा वाचिक, कायिक अभिनय पाहून सभागृह स्तब्ध झाले. तिच्या आवाजातील आणि चेह-यावरील भाव निव्वळ अप्रतिम होते. यात तिची मेहनत होती. संपूर्ण नाटक दोघांनाच ओढायचे असल्यामुळे पाठांतर मोठे होते. त्यात किरकोळ चुका झाल्या. त्या नजरअंदाज करता येतील.
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावताना फिरोज काझी यांनी चांगली तयारी केल्याचे जाणवले. छत्रपतींचा रुबाब आणि त्याचवेळी सद्यस्थिती पाहून त्यांची झालेली केविलवाणी अवस्था फिरोज काझी यांच्या देहबोलीत दिसत होती. काही प्रसंगात सद्गदीत झालेली त्यांची मुद्रा आणि आवाज कौतुकास्पदच. छत्रपतींचा गौरवशाली इतिहास सांगताना काझींच्या आवाजात म्हणावा तसा कणखरपणा जाणवला नाही.
नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना एकूणच उत्तम राहिली़ पहिल्या प्रवेशावेळी लाईट उशीरा लागला, एव्हढाच एक दोष़ त्यानंतर मात्र, प्रकाश योजना उत्तम राहिली. वेषभूषा, रंगभूषाही साजेशी होती. एकूणच प्रयोग उत्तम झाला. पण द्विपात्री प्रयोगापेक्षा घटनांतून हा प्रयोग पुढे नेला असता तर अधिक रंजक झाला असता. पहिल्या अंकात केवळ एकच प्रवेश तर दुसºया अंकात दोन प्रवेश अशा तीन प्रवेशातच नाटक संपते़ प्रेक्षकांना असे लांबवर खेचण्याची बाब खटकते.

कलाकार भूमिका
फिरोज काझी छत्रपती शिवाजी महाराज
शितल परदेशी न्यूज अँकर

तंत्रज्ञ
दिग्दर्शक दादा नवघरे
नेपथ्य सुहास लहासे, समीर काझी, रोहिदास गाडे, नवनाथ चेडे, गणेश लवांडे, किशोर तुपविहिरे
प्रकाश योजना वाल्मिक जाधव
पार्श्वसंगीत दादा नवघरे, हयुम शेख
रंगभूषा शाम मोहिते, स्नेहल कुलकर्णी
वेशभूषा अभिलाषा पाटील, अरुण भारस्कर


आज सादर होणारे नाटक
ती खिडकी

Web Title: Amateur State drama competition 2018: Chhatrapati Shivaji's Jihad in color of two characters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.