भारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही; माजी सरपंच बरळला... घाबरून पळाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 12:58 PM2019-02-19T12:58:49+5:302019-02-19T13:03:53+5:30

आपल्या भारत देशाबाबत श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावच्या माजी सरपंचाने अक्षरशः अकलेचे तारे तोडले आहेत. ''भारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही'',असे वादग्रस्त विधान विसापूरचा माजी सरपंच जब्बार सय्यदने केले आहे.

ahmednagar : Visapur's former Sarpanch Jabbar saeed Controversial statement against India over Pulwama Terror Attack | भारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही; माजी सरपंच बरळला... घाबरून पळाला!

भारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही; माजी सरपंच बरळला... घाबरून पळाला!

Next
ठळक मुद्देभारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही, विसापूरच्या माजी सरपंचाचे विधान माजी सरपंच जब्बार सय्यदच्या अटकेची मागणीसाठी गावकरी आक्रमक

अहमदनगर - आपल्या भारत देशाबाबत श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावच्या माजी सरपंचाने अक्षरशः अकलेचे तारे तोडले आहेत. ''भारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही'',असे वादग्रस्त विधान विसापूरचा माजी सरपंच जब्बार सय्यदने केले आहे. सय्यदच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे गावामध्ये तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. सय्यदला तात्काळ अटक करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी गाव बंद केला आहे. 

सोमवारी (18 फेब्रुवारी) संध्याकाळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. याच सभेमध्ये बोलताना जब्बार सय्यदने म्हटले की, 'भारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही'. 
जब्बार सय्यदच्या वादग्रस्त विधानाचा गावकऱ्यांकडून निषेध नोंदवण्यात येत आहे. गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. जब्बार सय्यदच्या अटकेच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी आक्रमक होत आंदोलन छेडले आहे. सर्व व्यापा-यांनी तातडीने आपले व्यवसाय बंद केले आहेत.

बेलवंडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ यांनी गावाला भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, घटनेनंतर माजी सरपंच जब्बार सय्यद फरार झाला आहे. मात्र त्याला तातडीने ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन पडवळ यांनी दिली आहे. 

Web Title: ahmednagar : Visapur's former Sarpanch Jabbar saeed Controversial statement against India over Pulwama Terror Attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.