नगरचे पोलीस भिडेंचे धारकरी - जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:34 PM2018-07-02T13:34:19+5:302018-07-02T13:39:53+5:30

येथील पोलिसांनी आरोपीला न पकडता दांगटच्याच भावाला अटक केली असून, येथील पोलीस भिडेंचे धारकरी असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी नगर येथे केला.

Ahmednagar Police bhide's dharkari- Jitendra Awhad | नगरचे पोलीस भिडेंचे धारकरी - जितेंद्र आव्हाड

नगरचे पोलीस भिडेंचे धारकरी - जितेंद्र आव्हाड

googlenewsNext
ठळक मुद्देपुरोगामी विचाराचा सैनिक असलेला राष्ट्रवादी युवक काँगे्रसचा सरचिटणीस गजेंद्र दांगट या तरुणावर भिडे समर्थकांनी प्राणघातक हल्ला केला.नालेगाव येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या गजेंद्र दांगट यांची आव्हाड यांनी रविवारी येथील खासगी रुग्णालयात येऊन भेट घेतली. पोलिसांनी मात्र आरोपीला न पकडता दांगटच्याच भावाला अटक केली असून, येथील पोलीस भिडेंचे धारकरी असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी नगर येथे केला.

अहमदरनगर : पुरोगामी विचाराचा सैनिक असलेला राष्ट्रवादी युवक काँगे्रसचा सरचिटणीस गजेंद्र दांगट या तरुणावर भिडे समर्थकांनी प्राणघातक हल्ला केला. येथील पोलिसांनी मात्र आरोपीला न पकडता दांगटच्याच भावाला अटक केली असून, येथील पोलीस भिडेंचे धारकरी असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी नगर येथे केला.
नालेगाव येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या गजेंद्र दांगट यांची आव्हाड यांनी रविवारी येथील खासगी रुग्णालयात येऊन भेट घेतली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सरकार व पोलीस प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, जातीयवाद्यांनी दांगट यांच्या घरावर हल्ला करत धांगडधिंगा घातला. पोलिसांनी मात्र हल्ला करणाऱ्या जातीयवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्याचे काम केले असून हे पोलीस आहेत की हैवान असा सवाल उपस्थित करत रत्नपारखीला हाकलून द्या, अशी मागणी त्यांनी केली.
छिंदम आणि मुदगलचे असलेले आर्थिक संबंध संपूर्ण नगरला माहित आहेत. छिंदमविरोधात दांगट यांनी मोर्चे काढले. अटकेची मागणी केली. तेव्हा हात घालू नको, आमचे आर्थिक व्यवहार अडकतील, आम्ही मरून जाऊ, असे मुदगल याने दांगटला सांगितले. यांचे अर्थिक व्यवहार आहेत, म्हणून कुणी विचारांची लढाई लढायचीच नाही का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सहनशीलतेला काही मर्यादा आहेत, ज्या पध्दतीने भिडेंचे वर्तन आहे, त्याच्या समर्थकांचे वर्तन आहे. तो स्वत: म्हणतो येथील गोरगरिबांना मारून टाका. हे वाक्य भिडेंचे आहे. ते मी पुराव्यानिशी सिध्द करून दाखवतो.
भिडेंना विरोध केल्यास मारून टाकू, अशी भूमिका भिडे समर्थकांची आहे. त्याला पोलीस साथ देत असतील आणि या प्रकरणातील माजी नगरसेवकाला वाचविण्याचा प्रयत्न करत असतील तर कायद्याचे राज्य संपले, असे म्हणायला हरकत नाही, असेही आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माणिक विधाते,नगरसेवक संपत बारस्कर, कुमार वाकळे, सुरेश बनसोडे, अभिजित खोसे, अजिंक्य बोरकर आदी यावेळी उपस्थित होते.

एसपींकडे उत्तर नाही, म्हणून फोन उचलला नाही

हल्लाप्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली, यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन घेतला नाही. त्यांच्याकडे माझ्या प्रश्नाचे उत्तर नसेल म्हणूनच त्यांनी फोन घेतला नाही, असे आव्हाड म्हणाले.

Web Title: Ahmednagar Police bhide's dharkari- Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.