राज्यात सर्वाधिक शेततळे अहमदनगरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 02:40 PM2018-06-20T14:40:23+5:302018-06-20T14:40:23+5:30

राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे, तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ योजना लागू केली.

Ahmednagar most of the farmers in the state | राज्यात सर्वाधिक शेततळे अहमदनगरला

राज्यात सर्वाधिक शेततळे अहमदनगरला

Next
ठळक मुद्दे९ हजार कामे पूर्ण : शेतकऱ्यांना ४५ कोटींचा हातभार, १८ हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

चंद्रकांत शेळके 
अहमदनगर : राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे, तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ योजना लागू केली. त्यात मे २०१८ अखेर अहमदनगर जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक ९ हजार शेततळ्यांची कामे पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यापोटी शेतकºयांना प्रत्येकी ५० हजारांप्रमाणे ४५ कोटींचे अनुदान मिळाले आहे. या योजनेतून १८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर, तसेच उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी २०१६मध्ये ‘मागेल त्याला शेतततळे’ ही योजना आणली.

जिल्हा, लक्षांक,पूर्ण कामे
अहमदनगर ९२००, ९१००
औरंगाबाद ९१००, ६९२०
नाशिक ९०००, ६१०३
सोलापूर ८०००, ४७६८
बीड ६५००, ५०४३
जालना ६०००, ५६५६
बुलढाणा ५०००, ३६५१
लातूर ४८००, १६२७
सांगली ४५००, ३६४३
अमरावती ४५००, ३२४८
यवतमाळ ४५००, ५०९०
नांदेड ४०००, १४८


राज्यातील सर्व जिल्ह्यांना १ लाख १२ हजार ३११ शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले. यात नगर जिल्ह्याने राज्यात बाजी मारली आहे. या योजनेंतर्गत नाशिक, औरंगाबाद, सोलापूरसह अहमदनगला प्रत्येकी सुमारे ९ हजार शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले गेले. कृषी व महसूल विभागाच्या योग्य नियोजनातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात नगर जिल्हा यशस्वी ठरला.
दुसरीकडे नाशिक, औरंगाबाद हे जिल्हे ७५ ते ८० टक्क्यांवरच राहिले. गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांनी उद्दिष्टपूर्ती केली, परंतु त्यांच्या शेततळ्यांची संख्या नगरच्या तुलनेत अगदीच कमी होती.

राज्यातील सर्व जिल्ह्यांना १ लाख १२ हजार ३११ शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले. यात नगर जिल्ह्याने राज्यात बाजी मारली आहे. या योजनेंतर्गत नाशिक, औरंगाबाद, सोलापूरसह अहमदनगला प्रत्येकी सुमारे ९ हजार शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले गेले. कृषी व महसूल विभागाच्या योग्य नियोजनातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात नगर जिल्हा यशस्वी ठरला. दुसरीकडे नाशिक, औरंगाबाद हे जिल्हे ७५ ते ८० टक्क्यांवरच राहिले. गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांनी उद्दिष्टपूर्ती केली, परंतु त्यांच्या शेततळ्यांची संख्या नगरच्या तुलनेत अगदीच कमी होती.

कामे झालेल्या सर्व लाभार्थींना अनुदान वाटप झाले आहे. त्यामुळे अजून ५ हजार कामांची आखणी झालेली आहे. याबाबत शासनाकडून वाढीव उद्दिष्ट घेतले जाईल. एकूणच शेततळ्यांमुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.
-पंडित लोणारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

Web Title: Ahmednagar most of the farmers in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.