अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भाजपच्या ‘सुजय’ यांचा ‘विजय’ निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 06:43 PM2019-05-23T18:43:59+5:302019-05-23T18:44:04+5:30

Ahmednagar Lok Sabha Election Results 2019

Ahmednagar Lok Sabha Election 2019 live result & winner: sujay vikhe near by winning condition | अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भाजपच्या ‘सुजय’ यांचा ‘विजय’ निश्चित

अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भाजपच्या ‘सुजय’ यांचा ‘विजय’ निश्चित

googlenewsNext

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे यांनी यांनी अखेरच्या फेरीपर्यत 2 लाख 74 हजार मतांची आघाडी मिळवली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला असून अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना हार पत्करावी लागली.
सुरुवातीपासूनच भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी आघाडी घेतली आहे. मतांच्या आघाडीेची आगेकूच विखे यांनी सुरुच ठेवली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून अहमदनगर येथील एमआयडीसी येथील वखार महामंडळात मतमोेजणीला सुरुवात झाली.
डॉ.सुजय विखे यांना 6 लाख 88 हजार मते मिळाली तर त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना 4 लाख 14 हजार 423 मते मिळाली. ताज्या आकडेवारीनुसार विखे यांनी २ लाख ७७ हजारांचे लीड मिळाले आहे. सर्वच मतदारसंघातून विखे यांना लीड मिळाली आहे. सवार्धिक लीड राहुरी मतदारसंघातून मिळाले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ५४ हजार २४८ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६४.२६ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत भाजपचे दिलीप गांधी यांना ६ लाख ३ हजार ९७६ मतांसह विजय साकारला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिवगंत राजीव राजळे यांना ३ लाख ९५ हजार ५६९ मतं मिळाली होती.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सरासरी 64.26 टक्के मतदान झाले. सर्वा धिक मतदान राहुरी मतदारसंघात झाले असून सर्वात कमी मतदान अहमदनगर शहर मतदारसंघात झाले आहे. शेवगावमध्ये ६३.४० टक्के, राहुरी ६६.७७ टक्के, पारनेर ६६.१० टक्के, अहमदनगर शहर ६०.२५ टक्के, श्रीगोंदा ६४.७५ तर कर्जत-जामखेडमध्ये ६४.१० टक्के मतदान झाले.

ही पाहा आकडेवारी

विधानसभाडॉ.सुजय विखे (BJP)आ.संग्राम जगताप(NCP)विखे यांचे लीड
कर्जत-जामखेड1,02,34178,21524,126
श्रीगोंदा1,09,10978,51130,598
नगर शहर1,08,86055,73853,122
पारनेर1,17,08180,37236,707
राहुरी1,23,41753,50169,916
शेवगाव-पाथर्डी1,27,70068,08659,614
एकूण 6,88,5084,14,4232,74,085











 

Web Title: Ahmednagar Lok Sabha Election 2019 live result & winner: sujay vikhe near by winning condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.