शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमसह 70 जणांना शहरबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 09:37 AM2019-02-19T09:37:52+5:302019-02-19T09:42:36+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला आज एक दिवसाची शहरबंदी करण्यात आली आहे.

ahmednagar 70 including shripad chindam banned from entering city for one day | शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमसह 70 जणांना शहरबंदी

शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमसह 70 जणांना शहरबंदी

Next
ठळक मुद्देशिवरायांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमसह 70 जणांना एक दिवसाची शहरबंदी16 फेब्रुवारी 2018मध्ये छिंदमने शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते

अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला आज एक दिवसाची शहरबंदी करण्यात आली आहे. श्रीपाद छिंदमसह एकूण 70 जणांना शहरात एक दिवस बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे. 
16  फेब्रुवारी 2018 रोजी छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. श्रीपाद छिंदमने पीडब्ल्यूडीच्या एक कर्मचाऱ्यासोबत फोनवर संपर्क साधताना शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरले. याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यानंतर छिंदमवर सर्व स्तरातून सडकून टीका करण्यात आली. याप्रकरणी छिंदमला हद्दपार करण्यात आले. 

अनेक ठिकाणी छिंदमविरोधात आंदोलनंदेखील करण्यात आली. त्यानंतर भाजपाने छिंदमची पक्षातून हकालपट्टी करत त्याच्याकडून उपमहापौरपदाचाही राजीनामाही घेतला होता.

Web Title: ahmednagar 70 including shripad chindam banned from entering city for one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.