अहमदनगरच्या 'माईक'सह 'ड्रायव्हर' पुरुषोत्तममध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:22 PM2017-08-24T12:22:57+5:302017-08-24T12:38:13+5:30

अहमदनगर : महाराष्ट्रातील मानाच्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा बिगूल वाजला असून अंतिम फेरीसाठी राज्यभरातील ९ एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगरमधील न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाची माईक आणि पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ड्रायव्हर या दोन एकांकिकांनी अंतिम फेरीत एन्ट्री केली आहे. 

Ahmadnagar's Mike and driver Ekankikee's Purushottam entry | अहमदनगरच्या 'माईक'सह 'ड्रायव्हर' पुरुषोत्तममध्ये

अहमदनगरच्या 'माईक'सह 'ड्रायव्हर' पुरुषोत्तममध्ये

Next
ठळक मुद्देअंतिम फेरीसाठी ९ एकांकीका पात्र माईक - न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालय, अहमदनगरड्रायव्हर - पेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर 

अहमदनगर : महाराष्ट्रातील मानाच्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा बिगूल वाजला असून अंतिम फेरीसाठी राज्यभरातील ९ एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगरमधील न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाची माईक आणि पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ड्रायव्हर या दोन एकांकिकांनी अंतिम फेरीत एन्ट्री केली आहे. 


८ ते २३ आॅगस्ट दरम्यान पुरुषोत्तमच्या प्राथमिक फेरीचा आवाज घुमला. प्राथमिक फेरीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यामधून सर्वोत्कृष्ट नऊ संघाची निवड अंतिम फेरीकरिता करण्यात आली. त्यामध्ये अहमदनगरच्या प्रेमराज सारडा महाविद्यालयाची ड्रायव्हर, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाची माईक, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या आफ्टर द डायरी, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या भेट, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या मुकुंद कोणी हा पाहिला, मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ए एस एल प्लिज, काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या साने आणि कंपनी, बीएमसीसी महाविद्यालयाच्या सॉरी परांजपे आणि सर परशूराम भाऊ महाविद्यालयाच्या भूमिका या एकांकिकेंचा समावेश आहे. अंतिम फेरी ९ आणि १० संप्टेबर रोजी पार पडणार आहे. माईक एकांकिका न्यू आर्टस कॉमर्स  सायन्स महाविद्यालयाची निर्मिती आहे.  संदीप दंडवते लिखित व कृष्णा वाळके याने दिग्दर्शन केले आहे. त्यामध्ये कृष्णा वाळके, विराज अवचित्ते, ऋषभ कोन्डावार, संकेत जगदाळे, अमित रेखी, निखिल शिंदे, शुभम पोपळे, तंत्रज्ञ अमोल साळवे, प्रिया तेलतुंमडे यांनी काम केले आहे. संघाला प्रा. अनंत काळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ड्रायव्हर एकांकिका पेमराज सारडा महाविद्यालयाची निर्मिती आहे. नवोदित लेखक अमोल साळवे यांनी लेखन केले आहे.

अंतिम स्पधेर्तील एकांकिका - 
माईक - न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, अहमदनगर
ड्रायव्हर -प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर
आफ्टर द डायरी - आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे
भेट - फर्ग्युसन महाविद्यालय,पुणे
मुकुंद कोणी हा पाहिला - गरवारे वाणिज्य महाविद्यालय,पुणे
ए एस एल प्लिज - मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय , पुणे
साने आणि कंपनी - काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे 
सॉरी परांजपे - बीएमसीसी महाविद्यालय,पुणे 
भूमिका - सर परशूराम भाऊ महाविद्यालय,पुणे
 

Web Title: Ahmadnagar's Mike and driver Ekankikee's Purushottam entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.