भर ग्रामसभेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 01:26 PM2018-05-25T13:26:40+5:302018-05-25T15:10:23+5:30

ग्रामसभेमध्ये एका महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

Ahmadnagar : woman's suicide attempt in Gramsabha | भर ग्रामसभेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

भर ग्रामसभेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

अहमदनगर : ग्रामसभेमध्ये एका महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. छाया जरे असे या महिलेचं नाव आहे. घराच्या उताऱ्यावरून परस्पर नाव कमी केल्याच्या कारणामुळे छाया जरे यांनी आत्महत्या करण्याचं पाऊल उचललं. नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतील हा प्रकार आहे. ग्रामसेवकाच्या अंगावर शाईफेक करत छाया जरे यांनी विषप्राशन केले. दरम्यान, या घटनेनंतर छाया जरे यांनी तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, छाया आणि तिच्या नवऱ्याच्या नावावर राहत्या घराची नोंद होती. परंतु, मागील महिन्यात पती, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने आर्थिक व्यवहार करून छाया हिचे नाव घराच्या नोंदीतून कमी केल्याची तक्रार छायाने जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, त्‍यांच्या तक्रारीची उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे चिडलेल्या छाया यांनी ग्रामसभा सुरू असताना आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसेच ग्रामसेवकाच्या अंगावर शाई फेकत विष प्राशन केले. महिला पोलीस नसल्याने अडवण्याचा प्रयत्न झाला नाही.  

दरम्यान, छाया जरे यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

 

Web Title: Ahmadnagar : woman's suicide attempt in Gramsabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.