अहमदनगर महापालिकेवर पुन्हा भगवा फडकेल : उध्दव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 03:32 PM2018-10-21T15:32:05+5:302018-10-21T15:33:02+5:30

लवकरच अहमदनगर महापालिकेची निवडणुक होणार आहे. शहरातील सेनेचे कार्यकर्ते जनतेसाठी काम करताना दिसत आहेत.

Ahmadnagar again will hoist the saffron party: Uddhav Thackeray | अहमदनगर महापालिकेवर पुन्हा भगवा फडकेल : उध्दव ठाकरे

अहमदनगर महापालिकेवर पुन्हा भगवा फडकेल : उध्दव ठाकरे

Next

अहमदनगर : लवकरच अहमदनगर महापालिकेची निवडणुक होणार आहे. शहरातील सेनेचे कार्यकर्ते जनतेसाठी काम करताना दिसत आहेत. त्यामुळे मला प्रचाराला येण्याची गरज नाही. महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा जोमाने फडकल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अहमदनगर शहरातील जाहीर सभेत केले.
नगरला एक चांगला इतिहास आहे. अनेक चांगल्या माणसांच्या नावाने नगरची ओळख समृध्द झाली आहे. मात्र आजचे नगर गुन्हेगारीचे झाले आहे. आजचं नगर म्हटलं की विखे, कर्डीले अन छिंदम समोर येतात. निवडून दिलेल्या खासदाराला नगर ओळखत नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्यानांही नगरकर जनता ओळखणार नाहीत. ज्या पक्षाचा नगरसेवक छिंदम आहे तो पक्ष कसा असेल, याचा विचार करा. माझ्या शिवसैनिकांची हत्या झाली. त्यांचे खुनी अजूनही पकडले नाहीत. मात्र आमची सर्वसामान्यांसाठी काम करणारी भगिनी भाग्यश्री मोकाटे हिच्यावर मोक्का लावता. अरे हा कुठला न्याय आहे. ही प्रशासनाची भुमिका आम्ही खपवून घेणार नाहीत, असेही ठाकरे म्हणाले.

Web Title: Ahmadnagar again will hoist the saffron party: Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.