श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने राज्यातील ११ अनाथालयांना वाटले दहा टन धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 06:51 PM2018-03-20T18:51:02+5:302018-03-20T18:51:02+5:30

अग्निपंख फौंडेशनने २२ विद्यालये आणि २४ प्राथमिक शाळांमध्ये राबविलेल्या एक मूठ अनाथांसाठी या उपक्रमात सुमारे १० मेट्रीक टन धान्य जमा झाले असून हे धान्य राज्यातील अनाथ, आदिवासी, दिव्यांग, मूकबधिर मुलांच्या ११ वसतिगृहांना पाठविण्यास सुरूवात झाली आहे.

Agnipankh Foundation in Srigonda had 11 tons of grains allocated | श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने राज्यातील ११ अनाथालयांना वाटले दहा टन धान्य

श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने राज्यातील ११ अनाथालयांना वाटले दहा टन धान्य

googlenewsNext

श्रीगोंदा : डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचाराने प्रेरित होऊन काम असलेल्या अग्निपंख फौंडेशनने २२ विद्यालये आणि २४ प्राथमिक शाळांमध्ये राबविलेल्या एक मूठ अनाथांसाठी या उपक्रमात सुमारे १० मेट्रीक टन धान्य जमा झाले असून हे धान्य राज्यातील अनाथ, आदिवासी, दिव्यांग, मूकबधिर मुलांच्या ११ वसतिगृहांना पाठविण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून अनाथाची भूक भागणार आहे.
महादजी शिंदे, श्रीमंत विजयाराजे शिंदे कन्या ज्ञानदीप, स्वामी समर्थ, मुरलीधर होनराव, कौशल्यादेवी नागवडे, स्कूल सनराईज, जिल्हा परिषद मुले व मुलींची शाळा (श्रीगोंदा) जनता विद्यालय, कन्या जनता, परिक्रमा (काष्टी), इंदिरा गांधी (श्रीगोंदा फॅक्टरी), न्यू इंग्लिश (मढेवडगाव), व्यंकनाथ (लोणीव्यंकनाथ), छत्रपती शिवाजी (बेलवंडी) विद्याधाम (देवदैठण), यशवंतराव चव्हाण, घारगाव, कोळाईदेवी ( कोळगाव), पंडित जवाहरलाल नेहरू (आढळगाव), वळणेश्वर (अजनुज), पंडित जवाहरलाल नेहरू (पिंपळगाव पिसा), हंगेश्वर (हंगेवाडी) या विद्यालयामध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.
राज्यातील महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्था श्रीगोंदा, सावली सेवाभावी संस्था केडगाव अहमदनगर, अनामप्रेम संस्था अहमदनगर, जिजाऊ बालसदन कोळे, ता. कराड, आदिवासी युग प्रवर्तक दगडी बारडगाव ता. कर्जत, सहारा अनाथालय, गेवराई, जि. बीड. सेवालय संस्था, हासेगाव, औसा, जि. लातूर, सार्थक सेवा संघ आंबळे, ता. पुरंदर, जि. पुणे, अविश्रांती बालसदन दौंड, सहारा अनाथालय जामखेड, शाहू बोर्डिंग सातारा व महात्मा फुले आश्रमशाळा घारगाव या संस्थांना धान्य पाठविण्यात येत आहे.

अग्निपंख फौंडेशनच्या ‘एक मूठ अनाथांसाठी..’ राबविलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवेतून काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण होणार त्यामुळे हा उपक्रम दरवर्षी राबविण्याची गरज आहे.
-तुकाराम कन्हेरकर, प्राचार्य, महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा.

मला कुणाला तरी मदत करण्याची इच्छा होती आणि एक मूठ अनाथांसाठी... या उपक्रमात गोरगरीब विद्यार्थी मित्रांना धान्यरुपी मदत करताना खूप आनंद झाला. पुढील वर्षीही या उपक्रमात भाग घेणार आहे.
-वैभव शिंदे, इयत्ता आठवी, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, आढळगाव.

महिलांचा सहभाग

या उपक्रमात आढळगाव येथील महिलांनी तसेच श्रीगोंदा व देवदैठण काही कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी जादा धान्य दिले तर देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेतील साहील गुंजाळ या विद्यार्थ्यांने सर्व प्रकारचे धान्य दिले. तर वेळू येथील शेतकऱ्यांनी घरोघर फिरून १०० किलो धान्य जमा केले. आढळगाव येथील अग्निपंखचे लाईफमेंबर महेशराव शिंदे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ५१ हजाराचा धनादेश दिला.

Web Title: Agnipankh Foundation in Srigonda had 11 tons of grains allocated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.