पालकमंत्री शिंदे यांच्या शिष्टाईनंतरही कृषिकन्या ५व्या दिवशी उपोषणावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 05:20 AM2019-02-09T05:20:33+5:302019-02-09T05:21:14+5:30

किसान क्रांती समन्वय समितीच्या समर्थनार्थ पुणतांबा येथे सुरू असलेल्या कृषिकन्यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पाचव्या दिवशी प्रकृती खालावल्याने शुभांगी जाधव हिला जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.

Aging on 5th day of fasting even after tweeting the Guardian Minister Shinde | पालकमंत्री शिंदे यांच्या शिष्टाईनंतरही कृषिकन्या ५व्या दिवशी उपोषणावर ठाम

पालकमंत्री शिंदे यांच्या शिष्टाईनंतरही कृषिकन्या ५व्या दिवशी उपोषणावर ठाम

googlenewsNext

अहमदनगर - किसान क्रांती समन्वय समितीच्या समर्थनार्थ पुणतांबा येथे सुरू असलेल्या कृषिकन्यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पाचव्या दिवशी प्रकृती खालावल्याने शुभांगी जाधव हिला जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी अर्धा तास रास्ता रोको केला. दुपारी पालकमंत्री राम शिंदे यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु कृषिकन्यांनी स्पष्ट नकार दिल्याने त्यांची शिष्टाई असफल ठरली.

निकिता जाधव, शुभांगी जाधव, पूनम जाधव या कृषिकन्यांसह काही महिला ५ दिवसांपासून उपोषणाला बसल्या आहेत. सरकारने २२ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी दिली. पेन्शन योजना लागू केली. शेतीमालास बाजारभाव मिळण्याकरिता प्रयत्न चालू आहेत. जिल्ह्यासाठी ६०० कोटींचा निधी दिला. आपल्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांची संयुक्त बैठक होणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Aging on 5th day of fasting even after tweeting the Guardian Minister Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.