चोरी प्रकरणी आरोपीस सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 07:34 PM2019-07-17T19:34:10+5:302019-07-17T19:36:23+5:30

शेतातील इलेक्ट्रीक मोटार चालू करून दुचाकीवरून जात असलेल्या फिर्यादीस आरोपी नारायण नामदेव वायकर याने रस्त्यात अडवून धारदार हत्याराने मारहाण करून खिशातील रोख रक्कम काढून घेतल्याप्रकरणी

The accused accused of theft case for seven years | चोरी प्रकरणी आरोपीस सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

चोरी प्रकरणी आरोपीस सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

googlenewsNext

नेवासा : शेतातील इलेक्ट्रीक मोटार चालू करून दुचाकीवरून जात असलेल्या फिर्यादीस आरोपी नारायण नामदेव वायकर याने रस्त्यात अडवून धारदार हत्याराने मारहाण करून खिशातील रोख रक्कम काढून घेतल्याप्रकरणी येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी आरोपी नारायण नामदेव वायकर यास दोषी धरून सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

१३ जुलै १५ रोजी फिर्यादी धरम धनसिंग परदेशी (रा. जळके बु. ता. नेवासा) हे त्यांची इलेक्ट्रीक मोटार चालू करून नगर ते औरंगाबाद जाणारे महामार्गावरून मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या शेताकडे जात असताना आरोपी नारायण नामदेव वायकर (रा. सोनेवाडी ता. कोपरगाव), संतोष अर्जुन निरगुडे (रा. पायरा ता.सिन्नर जि. नाशिक) व संदिप नारायण शेळके, (रा. मिरगाव ता सिन्नर जि. नाशिक) हे त्यांचे मोटारसायकलवरून पाठीमागून ट्रीपलसीट येवून फिर्यादीस वैजापूर जाणारा रस्ता कोठे आहे? असे विचारून त्यास त्यांनी गाडी आडवी लावून फिर्यादीचा रस्ता आडवला. आरोपी नारायण नामदेव वायकर यांनी त्याच्या जवळील असलेल्या धारदार हत्याराने फिर्यादीस मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम ८०० रुपये बळजबरीने काढून घेवून लाथाबुक्कयाने मारहाण केली. त्यावेळी रस्त्याच्या दुस-या बाजुने एक ट्रॅक्टर चारा घेवून जात होता, तेव्हा फिर्यादीचा ओरडण्याचा आवाज ऐकून ते मदतीला धावले व आरोपीच्या तावडीतून फिर्यादीची सुटका केली. आरोपी नारायण नामदेव वायकर यास जागेवर पकडले तर उर्वरीत आरोपी पळून गेले.
या प्रकरणी नेवासा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकारी स.पो.नि. विनय सरवदे यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकारपक्षाच्या वतीने एकून आठ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला पुरावा व सरकारपक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी नारायण नामदेव वायकर यास दोषी धरून त्यास भा.द.वि. कलम ३९७ नुसार सात वर्ष सश्रम कारावास तसेच भा.द.वि. कलम ३४१ नुसार एक महिना कैद व ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दहा दिवस कैद अशी शिक्षा सुनावली. तसेच उर्वरीत आरोपींची पुराव्या अभावी निर्दोश मुक्तता केली. या खटल्यात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड.देवा काळे यांनी काम पाहिले. त्यांना पो. हे, का. रेवणनाथ मरकड व पो, कॉ. सुभाष हजारे, पो.मा.राठोड, पो. हे. कॉ. एम.वी. शिंदे यांचे सहाकर्य लाभले.

Web Title: The accused accused of theft case for seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.