९३ वर्षांचा योगायोग : अकोलेतील विद्यार्थ्यांनी पाठवले इंग्लडच्या राणीला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 06:28 PM2019-03-19T18:28:20+5:302019-03-19T18:31:41+5:30

अकोले तालुक्यातील शेंडी येथील आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या अनुदानित आश्रमशाळेतील ९३ विद्यार्थ्यांनी इंग्लडच्या राणी एलिझाबेथ यांना ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या भंडारदरा धरणास भेट देण्याचे निमंत्रण एका ई-मेलद्वारे दिले आहे.

9 3 years coincidence: Akole students sent invitations to Queen Queen of England | ९३ वर्षांचा योगायोग : अकोलेतील विद्यार्थ्यांनी पाठवले इंग्लडच्या राणीला निमंत्रण

९३ वर्षांचा योगायोग : अकोलेतील विद्यार्थ्यांनी पाठवले इंग्लडच्या राणीला निमंत्रण

Next

राजूर : अकोले तालुक्यातील शेंडी येथील आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या अनुदानित आश्रमशाळेतील ९३ विद्यार्थ्यांनी इंग्लडच्या राणी एलिझाबेथ यांना ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या भंडारदरा धरणास भेट देण्याचे निमंत्रण एका ई-मेलद्वारे दिले आहे.
भंडारदरा धरणाने वयाची ९२ वर्षे पूर्ण केली आणि ९३ व्या वर्षांत पदार्पण केले. इंग्लडच्या महाराणी एलिझाबेथ यांचेही सध्याचे वय ९३ वर्षे आहे. हे वय पाहून आमच्या आश्रमशाळेचे कर्मचारी विकास पवार यांनी हा उपक्रम करण्याचे सुचवले. त्यानुसार शाळेतील ९३ विद्यार्थ्यांनी या महाराणीला या धरणाच्या भेटीसाठी निमंत्रित करण्याचे पत्ररुपी संदेश इमेलद्वारे पाठविण्यात आल्याचे प्राचार्य अशोक भालेराव यांनी सांगितले. या पत्रामध्ये ब्रिटिश महाराणी, प्रिन्स व त्यांच्या पत्नी यांनाही आमंत्रित केले आहे.
२ लाख २९ हजार एकर क्षेत्रातील शेतीला दुष्काळापासून संरक्षण देण्याच्या दृष्टीने २७० मीटर लांबीच्या आणि ८२.३४ मीटर उंचीच्या दगडी भंडारदरा (विल्सन डॅम) धरणाचे काम करण्यात आले. १९०३ मध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता आर्थर हिल यांनी धरणाची जागा शोधून काढली तर सर्वेक्षणाचे काम सहायक अभियंता सी.बी. पुली यांनी केले. हे काम १९०९-१० च्या दरम्यान सुरु झाले. १९२६-२६ च्या मोसमात पूर्ण झाले. धरण बांधण्यासाठी ८४ लाख १४ हजार रुपये खर्च आला होता. १० डिसेंबर १९२५ रोजी तत्कालीन गव्हर्नरांच्या हस्ते आणि इंग्रज अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भंडारदरा धरणाचे उद्घाटन झाले होते. ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमता असणाऱ्या धरणाचे पाणलोट क्षेत्र १२०.३२ चौरस किलोमीटर इतके आहे. पुढे १९६९ मध्ये भूकंपाच्या धक्क्याने धरणास तडे गेले आणि मोठी शस्रक्रिया करण्यात आली. यात धरणाच्या भिंतीच्या मूळ स्वरूपात मोठा बदल घडवून आला. या उपक्रमाचे संस्थेचे सचिव प्रा.एम.एम.भवारी, अध्यक्ष भरत घाणे, माधव गभाले व इतरांनी कौतुक केले.

Web Title: 9 3 years coincidence: Akole students sent invitations to Queen Queen of England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.