जामखेडमधील अतिक्रमणधारकांन पाच पर्यंत डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 02:32 PM2018-06-20T14:32:56+5:302018-06-20T15:34:37+5:30

शहरातील रस्त्यांवरील व राज्य महामार्गावरील  अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत दिली आहे. परंतु तत्पूर्वीच अतिक्रमण धारक स्वत:हून अतिक्रमण काढून घेत आहेत.

5 deadline to encroachment in Jamkhed | जामखेडमधील अतिक्रमणधारकांन पाच पर्यंत डेडलाईन

जामखेडमधील अतिक्रमणधारकांन पाच पर्यंत डेडलाईन

googlenewsNext

जामखेड : शहरातील रस्त्यांवरील व राज्य महामार्गावरील  अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत दिली आहे. परंतु तत्पूर्वीच अतिक्रमण धारक स्वत:हून अतिक्रमण काढून घेत आहेत.
       शहरातील चिंचपूर हद्द ते साकत फाटा, जामखेड - बीड रस्ता, खर्डा चौक ते खेमानंद हायस्कूल तसेच शहरातील मेनपेठ ते आंबेडकर चौक, खर्डा चौक ते आमरधाम तपनेश्वर रस्ता दुकानदारांनी केलेले अतिक्रमण, तसेच दुचाकी व चारचाकी वाहने दुकानासमोर लावल्याने रहदारीची होणारी कोंडी यामुळे प्रशासनाने तहसील कार्यालयात बैठक घेऊन आजपासूनअतिक्रमण काढण्यास सुरुवात होईल, असे सांगितले होते. 
आज सकाळी दहाच्या सुमारास तहसीलदार विशाल नाईकवडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, यांच्यासह नगरपरिषदेच्या अधिका-यांनी सकाळी दहा वाजता पोलीस बंदोबस्तात सर्वत्र फिरुन सर्व अतिक्रमण धारकांना आज सायंकाळी पाच वाजण्यापर्यंत अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अतिक्रमण धारकांनी स्वतहाहून अतिक्रमण काढण्याचा सुरवात केली आहे.

Web Title: 5 deadline to encroachment in Jamkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.