१९५ प्रशिक्षणार्थी जवान सैन्यात दाखल : एमआयआरसीत प्रशिक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 04:57 PM2018-07-21T16:57:34+5:302018-07-21T16:57:41+5:30

एमआयआरसी या सैन्य प्रशिक्षण केंद्रात १९५ प्रशिक्षणार्थी जवानांनी देशसेवेची शपथ घेत सैन्यात प्रवेश केला.

195 trainees included in the Army Army: Complete completion of MIRC training | १९५ प्रशिक्षणार्थी जवान सैन्यात दाखल : एमआयआरसीत प्रशिक्षण पूर्ण

१९५ प्रशिक्षणार्थी जवान सैन्यात दाखल : एमआयआरसीत प्रशिक्षण पूर्ण

Next

अहमदनगर : ‘बस इस ख्याल से जिंदा हू,
कि तू हमारा है.
जो तू ना रहा तो कुच नही है जीने मे,
ए मेरे वतन तुझे धूप कैसे छुएगी,
क्योंकी हजारो माँओ के आँचल है तेरे सीने मे’
या दृढनिश्चयाने येथील एमआयआरसी या सैन्य प्रशिक्षण केंद्रात १९५ प्रशिक्षणार्थी जवानांनी देशसेवेची शपथ घेत सैन्यात प्रवेश केला.
मेकॅनाईज्ड इन्फ्रंट्री रेजिमेंट सेंटर (एमआरआरसी) ही देशातील प्रमुख सैन्य प्रशिक्षण संस्थांपैकी एक आहे. सैन्यात भरती झाल्यानंतर प्राथमिक ३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे जवान सैन्यात दाखल होतात. शनिवारी (दि. २१) एमआयआरसीत झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये सैनिकांनी शानदार संचलन करत उपस्थितांची मने जिंकली. अखौरा ड्रिल स्टेडियमवर झालेल्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मेजर जनरल अजय चौहान (व्हीएसएम) यांनी परेडचे निरीक्षण केले. तत्पूर्वी जवानांनी चौहान यांच्यासह एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही. व्ही. सुब्रमण्यम (सेना मेडल) व कर्नल रसेल डिसुझा यांना सलामी दिली. त्यानंतर मेजर जनरल चौहान यांनी उघड्या जीपमधून परेडचे निरीक्षण केले. जवानांनी आपापल्या धर्मग्रंथावर हात ठेवत धर्मगुरूंकरून देशसेवेची शपथ घेतली.
मेजर जनरल चौहान यांनी या सोहळ्याचे कौतूक करत जवानांना भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. सैन्यात भरती झाल्यानंतर प्रशिक्षणाचे हे पहिले पाऊल आता पूर्ण झाले आहे. अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. सैन्य जीवनात आपल्या कृतीने देशाचे, राज्याचे, युनिटचे, गावाचे नाव कसे उज्ज्वल होईल, याकडे लक्ष द्या. सैन्याचा गौरवपूर्ण इतिहास जपण्यासाठी प्रयत्न करा. दृढनिश्चय, विश्वास व प्रामाणिकपणे देशाची सेवा करा. देशाबाहेरील, तसेच देशांतर्गत संकटापासून देशवासियांचे रक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, याची आठवण नेहमी ठेवा, असे सांगत चौहान यांनी सैनिकांचा आत्मविश्वास वाढवला.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक
या प्रशिक्षण काळात १९५ पैकी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या तीन प्रशिक्षणार्थी जवानांचा विशेष पदक देऊन सन्मान करण्यात आला. जनरल सुंदरजी सुवर्णपदक बलविंदर सिंह याला, जनरल के. एल. डिसुजा रौप्यपदक बलराज सिंह याला, तर जनरल पंकज जोशी कांस्य पदक गजेंद्र सिंह याला देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या पाल्यांना देशसेवेत सुपूर्द केल्याबद्दल या जवानांच्या पालकांचाही गौरवपदक देऊन सन्मान करण्यात आला. आपला मुलगा देशाचा भावी रक्षक असल्याचे समाधान पालकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.

 

Web Title: 195 trainees included in the Army Army: Complete completion of MIRC training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.