नगर एलसीबीकडूुन १५ जणांना अटक, आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 06:48 PM2018-07-02T18:48:41+5:302018-07-02T18:49:04+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर शहर व नेवासा परिसरात जुगार, दारूअड्ड्यांसह अवैध वाळूवाहतुकीवर कारवाई करत १५ जणांना अटक केली. यावेळी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

15 looted by city LCB, arrested for carrying over eight lakhs | नगर एलसीबीकडूुन १५ जणांना अटक, आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

नगर एलसीबीकडूुन १५ जणांना अटक, आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext

अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर शहर व नेवासा परिसरात जुगार, दारूअड्ड्यांसह अवैध वाळूवाहतुकीवर कारवाई करत १५ जणांना अटक केली. यावेळी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील सिद्धार्थनगर येथील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस पथकाने छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. यावेळी १लाख ९ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ठिकाणी सचिन प्रभाकर परदेशी, अजय विजय त्रिभुवन, मनोहर अनिल म्हस्के, आकाश आनंद लावंद, राहुल श्रीरंग अडागळे, दीपक अर्जुन भोसले, संदीप विजय त्रिभुवन यांच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कॉन्स्टेबल राहुल सोळुंके यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तसेच सिद्धार्थनगर येथील काटवनामध्ये एका महिलेकडून ५० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. या ठिकाणी २५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंचपीर चावडी येथे देशी-विदेशी दारू विकताना दीपक जगन्नाथ कुसमुडे याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी ११२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नगर तालुक्यातील चास येथे पिंपळगाव रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ७० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी लक्ष्मण कारले, काशिनाथ पांडुरंग गायकवाड, बाळासाहेब रामभाऊ कारले, काशिनाथ धुरपाजी गावखरे, अकबर फकीर शेख, भीमाजी चंद्रभान जाधव यांना ताब्यात घेण्यात आले. नेवासा येथे अवैधरीत्या वाळूची वाहतूक सुरू असताना चालकासह वाळूने भरलेला ट्रक पकडण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मन्सूर सय्यद, फकीर शेख, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, संदीप पवार, विजय वेठेकर, विजय ठोंबरे, संदीप घोडके, संतोष लोढे, कोतकर, बेरडक, स्मिता भागवत, राहुल सोळुंके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: 15 looted by city LCB, arrested for carrying over eight lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.