१० उपजिल्हाधिकारी, १५ तहसीलदारांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 07:44 PM2019-02-21T19:44:02+5:302019-02-21T19:44:13+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २५ अधिका-यांच्या बदल्या झाल्या असून, त्यात १० उपजिल्हाधिकारी व १५ तहसीलदारांचा समावेश आहे.

10 Deputy Collector, 15 Tehsildars Transfer | १० उपजिल्हाधिकारी, १५ तहसीलदारांच्या बदल्या

१० उपजिल्हाधिकारी, १५ तहसीलदारांच्या बदल्या

googlenewsNext

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २५ अधिका-यांच्या बदल्या झाल्या असून, त्यात १० उपजिल्हाधिकारी व १५ तहसीलदारांचा समावेश आहे. या सर्व अधिका-यांना नाशिक विभागांतर्गत नियुक्त्या मिळाल्या आहेत, तर नाशिक विभागातीलच अधिकारी नगरसाठी बदलून आले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील सर्व अधिका-यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २० फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश निघाले. यामध्ये नगर जिल्ह्यातील १० उपजिल्हाधिका-यांचा समावेश आहे. यापूर्वी उपजिल्हाधिकारी अरूण आनंदकर व जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित यांची बदली झालेली आहे. दरम्यान, बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांचीही बदली झाली.
उपजिल्हाधिका-यांसह जिल्ह्यातील १५ तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेशही बुधवारीच निघाले. गेल्या आठवड्यापासून हे अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत होते. बदलीचे आदेश मिळताच त्यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत.
विशेष म्हणजे यातील बहुतांश अधिका-यांना नाशिक विभागांतर्गत नियुक्त्या मिळाल्या आहेत. तर तेथीलच अधिकारी येथे बदलून आहे आहेत. ब-याच जागांवर अधिका-यांची त्याच पदावर केवळ अदलाबदली झालेली आहे.

बदली झालेले अधिकारी
उपजिल्हाधिकारी, सध्याची नियुक्ती, नवीन नियुक्ती
१) राजेंद्र वाघ भूसंपादन क्रं. १,  विशेष भूसंपादन अधिकारी, जळगाव
२) संदीप आहेर महसूल प्रांत, दिंडोरी, नाशिक
३) भागवत डोईफोडे प्रांत संगमनेर भूसंपादन अधिकारी, धुळे
४) ज्योती कावरे जिल्हा पुनर्वसन अधिकारी वैतरणा जलविद्युत प्रकल्प, नाशिक
५) गोविंद दाणेज प्रांत श्रीगोंदा-पारनेर उपजिल्हाधिकारी रोहयो, धुळे
६) निलेश जाधव भूसंपादन क्र. १५ सहायक आयुक्त (मावक), नाशिक
७) जयश्री माळी भूसंपादन क्र. ०३ जिल्हा पुरवठा अधिकारी, नगर
८) वामन कदम उपजिल्हाधिकारी रोहयो निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव
९) रविंद्र ठाकरे प्रांत, शिर्डी जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव
१०) धनंजय निकम साईबाबा संस्थान उपजिल्हाधिकारी, महसूल, नंदूरबार
---------------------------------------------------------------
- बदलून आलेले उपजिल्हाधिकारी (कंसात आधीची नियुक्ती)
१) उदय किसवे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. ७ (प्रांत, दिंडोरी, नाशिक)
२) पंकज चौबळ, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. १३ (उपजिल्हाधिकारी भूसंपादन, धुळे)
३) शशिकांत मंगरूळे, प्रांताधिकारी संगमनेर (उपजिल्हाधिकारी, प्रशासन, नाशिक)
४) महेश पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी (प्रांताधिकारी, निफाड)
५) संजय बागडे, प्रांताधिकारी, श्रीगोंदा-पारनेर (सहायक आयुक्त (मावक) नाशिक)
६) राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. ३, (निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव)
७) जितेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी, रोहयो
८) गोविंद शिंदे, प्रांताधिकारी, शिर्डी (जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव)

बदली झालेले तहसीलदार नवीन नियुक्ती
अनिल दौंडे, राहुरी नाशिक
राहुल कोताडे, सामान्य प्रशासन, नगर सिन्नर, जि. नाशिक
जितेंद्र इंगळे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी तहसीलदार बागलाण, जि. नाशिक
मनिषा राशीनकर, धान्य वितरण अधिकारी धान्य वितरण अधिकारी, नाशिक
अप्पासाहेब शिंदे, नगर सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक
हेमा बडे, महसूल, जि. कार्यालय धान्य वितरण अधिकारी, मालेगाव, जि. नाशिक
सदाशिव शेलार, संजय गांधी योजना संजय गांधी योजना, मनपा क्षेत्र, नाशिक
राजेंद्र थोटे, पुनर्वसन अक्राणी, जि. नंदूरबार
सुधीर पाटील, नेवासा महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, अ. नगर
उमेश पाटील, निवडणूक शाखा नगर तालुका
गणेश मरकड, पारनेर भडगाव, जि. जळगाव
किरण सावंत पाटील, कर्जत अन्नधान्य वितरण अधिकारी, नगर
किशोर कदम, कोपरगाव चाळीसगाव, जि. जळगाव
सुभाष दळवी, श्रीरामपूर संजय गांधी योजना, जळगाव
मोहमंद फसियोदिन शेख, भूसुधार राहुरी


बदलून येणारे तहसीलदार
महेश शेलार, पुनर्वसन, नगर
ज्योती देवरे, भूसुधार, नगर
प्रवीण चव्हाणके, पारनेर
योगेश चंद्रे, कोपरगाव
सी. एम. वाघ, कर्जत
अमोल निकम, संगमनेर
प्रशांत पाटील, श्रीरामपूर
सुनील सैंदाणे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी
मनोज देशमुख, संजय गांधी योजना
रूपेश सुराणा, नेवासा
नरेशकुमार टी बहिरम, निवडणूक शाखा

 

Web Title: 10 Deputy Collector, 15 Tehsildars Transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.