‘‘ श्रमदेवतेची आराधना’’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 05:53 PM2019-05-04T17:53:08+5:302019-05-04T17:54:35+5:30

विजय आणि राजू दोघेही सख्खे भाऊ, दोघांचेही शिक्षण जेमतेम झालेले. विजय हा पापभिरू, शांत, सज्जन व कष्टाळू प्रवृत्तीचा याउलट राजू हा आळशी व गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता.

"Worship of work" | ‘‘ श्रमदेवतेची आराधना’’ 

‘‘ श्रमदेवतेची आराधना’’ 

googlenewsNext

डॉ.दत्ता कोहिनकर

विजय आणि राजू दोघेही सख्खे भाऊ, दोघांचेही शिक्षण जेमतेम झालेले. विजय हा पापभिरू, शांत, सज्जन व कष्टाळू प्रवृत्तीचा याउलट राजू हा आळशी व गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता.चटकन - कमी श्रमात उलटी - पालटी कामे करून पैसे कमावणे व आळसात दिवस खाण्यापिण्यात घालवणे. राजुला आवडायचे. श्रमजीवी विजयने काबाडकष्ट करून लोकसेवा व सत्याच्या मार्गाने नावलौकीक मिळवला होता. समाजात त्याला खूप मान मिळत होता. याउलट गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे राजु दुःखीकष्टी व  अपमानित जीवन जगत होता. लोक त्याला जवळ करत नव्हती. दोघेही एकाच संस्कारात वाढलेले पण आपले आरंभीचे असणे जरी आपल्या हाती नसले तरी नंतरचे होणे आपल्या हाती असते हे विजयने सच्चाई व दीर्घोद्योगाने पटवून दिले होते. 

खरोखर मित्रांनो काबाडकष्टाला - नैतिक मुल्यांची जोड दिल्यास जीवनाचा सन्मान सर्वत्र केला जातो. लहानपणी आजीने आम्हा मुलांना जग कधी बुडणार आहे हे तिला माहीत असल्याचे सांगितले. आम्ही उत्तराचा आग्रह धरत खूप गलका - गोंगाट केल्यावर ती म्हणाली. ज्या दिवशी माणसांच्या नजरेला थांबलेली - निवांत बसलेली - झोपलेली मुंगी दिसेल तेव्हा जग बुडेल. आम्ही सर्वांनी खुप शोध घेऊन थांबलेली मुंगी आमच्या नजरेला पडली नाही. आजीला या गोष्टीतून एवढेच सांगायचे होते. मुंगीसारखा शून्यवत - नगण्य जीव अहोरात्र काहीतरी करीत असतो. याउलट ज्याच्या ठायी ईश्वराने सर्व सामर्थ्य दिले तो मात्र आपल्या नाकर्तेपणाने सर्व सामर्थ्याची प्रतारणा करतो. माणसाला परमेश्वराने दोन हात दिलेत ते श्रम करण्यासाठी, इतरांना आधार देण्यासाठी व रंजले गांजलेल्यांची सेवा करण्यासाठी. ‘जेथे राबती हात तेथे हरी’’ ही संत गाडगेबाबांची धारणा होती . ज्या देशात श्रमाला प्रतिष्ठा लाभलेली असते अथवा श्रमाची उपासना निष्ठापुर्वक केली जाते तो देश समृध्द व अजिंक्य बनतो हा विचार गाडगेबाबांनी समाजासमोर प्रत्यक्ष स्वरूपात ठेवला होता. आज कमी श्रमात जास्त धन मिळविण्याची अपप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. पण या वाममार्गाने मिळवलेला पैसा मी-मी म्हणणार्या राज्यकर्त्यांना देखील तुरूंगाची हवा दाखवत आहे. करोडोपती असणारे महाभाग आज दुःखी-कष्टी होवून नैराश्याने आत्महत्या करत आहे. कारण श्रमाला प्रतिष्ठा व नैतिक मुल्यांना डावलून केलेल्या कृत्याचे हे फळ असते. कोणी एका शास्त्रज्ञाचे साडेतीन हजार प्रयोग फसले. परंतु पहाटेच्या वेळी प्रयोगशाळेचे दार उघडून तो कामाला लागत असे कोणी त्याला हिणवले, ‘या वाया गेलेल्या प्रयोगाची कहाणी जगाला कळली तर?  यावर तो म्हणाला हेच प्रयोग परत कोणाला करावे लागणार नाही. या कल्पनेने जग आनंदी होईल !* लोकशाहीर आण्णाभाऊ साठे म्हणायचे,* पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकर्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे * ’’.लहानपणीची एक बोधपर कविता सांगून जाते."The heights by greatman reached and kept were not attained by sudden flight.  But they while their companions slept were toilling upwards in the night."म्हणून माणसाने नेहमी दीर्घोउदयोगी रहावे.‘‘उद्योगाची घरी - रिद्धीसिद्धी पाणी भरी’’ या सुभाषिताचे सार जाणून घ्यावे. आयुष्यात काबाड कष्टाला - सेवेची, त्यागाची, लोककल्याणाची व सत्याची जोड देणारे विवेकानंद - शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले या महापुरूषंचा इतिहास आजही आपणांस प्रेरणा देतो व श्रमाला - नैतिक मुल्यांची जोड देऊन श्रमदेवतेची उपासना केल्यास आपण नियतीकडून सन्मानित झाल्याशिवाय राहणार नाही. अशी उच्चकोटीची शिकवण देतो. मग चला - उठो - जागे व्हा - श्रमदेवतेची पुजा केल्याशिवाय स्वस्थ बसू नका

(लेखक हे व्याख्याते आहेत. )

Web Title: "Worship of work"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.