आनंद तरंग - जीवन एक चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 07:36 AM2019-02-19T07:36:48+5:302019-02-19T07:37:09+5:30

नेहमीच असे मानले जाते की, कार्यकारण भावाला एक मर्यादा असते. कारण त्यात मेंदूतील विचार हे महत्त्वाचे असतात.

Wave wave - a miracle of life | आनंद तरंग - जीवन एक चमत्कार

आनंद तरंग - जीवन एक चमत्कार

Next

डॉ. मेहरा श्रीखंडे

नेहमीच असे मानले जाते की, कार्यकारण भावाला एक मर्यादा असते. कारण त्यात मेंदूतील विचार हे महत्त्वाचे असतात. तो आपल्या पाच कर्मेंद्रियांमध्ये अडकलेला असतो. त्यात बघणे, वास घेणे, स्पर्श करणे, चव घेणे व ऐकणे यांचा समावेश असतो. ज्या वेळी तुमच्या कार्यकारणभावाचा शेवट येतो, तेव्हाही तुम्ही तुमच्या शोधाच्या शेवटापर्यंत आलेला नसता. आपल्या जीवनातील अनेक गोष्टी जरी आपल्या बुद्धीला पटत असल्या, तरीही त्या सत्य आहेत, असे आपणास म्हणता येत नाही. आपण त्या तत्त्वाने खरे आहेत, असे मानतो व अगम्य गोष्टी श्रद्धेवर सोडून देतो.

आपल्यापैकी प्रत्येकात श्रद्धा, ठोस समजुती व आशा असतात, ज्या आपण दुसऱ्यांबरोबर वाटू शकत नाही व त्या आपल्या श्रद्धा आहेत, असे म्हणून त्यावर विजय प्राप्त करू शकत नाही. शास्त्राचे मूळ हे सत्यावर आधारित असून जे सत्य नाही ते असत्य मानले जाते, परंतु आपला शोध शास्त्राच्या पलीकडे जावयास हवा. या ग्रहावरील अगणित माणसे त्यांच्या आवाक्याबाहेर असणाºया त्याच्या शक्तीला मान देतात. आपल्या वैदिक ऋचा त्याचे महत्त्व सांगतात व आग, पृथ्वी, वारा, पाऊस, वादळे अशा सर्व नैसर्गिक गोष्टींची पूजा करतात. पृथ्वीवरील प्रत्येक अणूचे जीवन ठरविणारे व संपूर्ण सूर्यमालेत व विश्वात व्यापलेले. त्याचे अस्तित्व आहे हे मानण्याची अनेक कारणे होती. जीवन हाच एक चमत्कार आहे. मनुष्य हाही एक चमत्कार असून, ते एक अतिशय ताकदवान यंत्र आहे. आपल्यात असलेल्या प्रत्येक पेशीतील डी. एन. ए. जो प्रत्येक पेशीकेंद्रात असतो, त्यात मानवाच्या मनाचा वैश्विकतेचा नकाशा असतो, हा पूर्ण चमत्कार घडतो, तो केवळ कल्पनेपलीकडील असतो़
 

Web Title: Wave wave - a miracle of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.