spiritual: साधकाला फक्त सद्गुरुच करू शकतात अंतर्मुख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:19 PM2019-04-06T12:19:49+5:302019-04-06T12:19:54+5:30

कर्म भोगण्यासाठी मनुष्य पुन: पुन: जन्म घेतो व नवी कर्मे तयार करतो. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्याने अंतर्मुख झाले पाहिजे, ध्यान करून आपल्या आत्म्याला पवित्र व सशक्त केले पाहिजे. साधकाला फक्त सद्गुरुच अंतर्मुख करू शकतात.

spiritual: Only the Guru can show internal image | spiritual: साधकाला फक्त सद्गुरुच करू शकतात अंतर्मुख !

spiritual: साधकाला फक्त सद्गुरुच करू शकतात अंतर्मुख !

Next

कर्म भोगण्यासाठी मनुष्य पुन: पुन: जन्म घेतो व नवी कर्मे तयार करतो. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्याने अंतर्मुख झाले पाहिजे, ध्यान करून आपल्या आत्म्याला पवित्र व सशक्त केले पाहिजे. साधकाला फक्त सद्गुरुच अंतर्मुख करू शकतात. त्यामुळे आत्मसाक्षात्कारासाठी सद्गुरुंनाच परमात्मा मानून, शरिरभाव पूर्णपणे विसरून समर्पित होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे साधकाची सद्गुरुंकडून ग्रहण करण्याची क्षमता वाढते. सद्गुरुंची भूमिका क्षणिक असते. ते साधकाची परमात्म्याशी जोडणी करून देतात पुढची साधना साधकालाच करून मोक्षाची स्थिती प्राप्त करायची असते.  गुरुसंस्कृती नसलेल्या पाश्चात्य समाजातील साधकांनी तसेच बुद्धिवादी साधकांनी गुरूंना कसे ओळखता येईल? तर त्यांच्या आभामंडळावरून ओळखावे. जे भावपूर्ण वृत्तीचे आहेत, अशांनी समाधिस्थ गुरूंच्या स्थानी जाऊन आत्मसाक्षात्कारासाठी कळवळून विनवणी करावी, ‘सेवा’ मोक्षाचे महाद्वार आहे.  गुरूंची शरीरे वेगळी असू शकतात पण गुरुतत्व एकच असते. 

 नाभिचक्राचा संबंध तृप्ती व समाधान यांच्याशी आहे. मनुष्याचे नाभीचक्र शुद्ध झाल्यावर त्याच्या आध्यात्मिक प्रगतीची सुरुवात होते. पती-पत्नीमधील, आईवडील आणि मुले, तसेच भावंडांमधील संबंध सौहार्दाचे प्रेमाचे राहिले तर मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा येत नाही. आपण पूजा, मंदिरात नतमस्तक होणे किंवा दान करणे या आपल्या संस्कृतीतील महत्वाचे संस्कार गमावतो आहोत. कारण आपल्याकडे त्यासाठी ना वेळ आहे ना निरपेक्ष दान करण्याची वृत्ती. 

ध्यान हा एकच संस्कार आता शिल्लक राहिला आहे, जो मनुष्यसमाजात मनुष्यता आणू शकतो, त्याला एकत्र बांधून ठेवू शकतो. ज्ञानलालसा देखील ज्ञानप्राप्तीमध्ये बाधा बनते. सर्व भावना व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीशी निगडीत असतात. वस्तू, व्यक्ती आणि नातेसंबंधामध्ये अडकणे - मोक्ष आणि मुक्ती मध्ये बाधा होय. मोक्ष म्हणजे मुक्ती... भीतीपासून, चिंतेपासून, अगदी शारीरिक बंधनांतूनसुद्धा... मोक्षानंतर असतो केवळ आनंद. शब्दांमध्ये वर्णन न करता येणारा पण प्रत्येक क्षणी अनुभवता येणारा, जीवन व्यापून टाकणारा - आनंद. म्हणून मोक्ष आहे सुखी जीवनाची गुरुकिल्ली आणि अलौकिक यशाचा राजमार्ग.  मोक्ष... या कल्पनेबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचलित असलेली एक समजूत अशी की मोक्ष हा माणसाला त्याच्या मृत्यूनंतरच मिळतो. पण ही समजूत चुकीची आहे. मोक्षासाठी मृत्यू व्हायची वाट बघावी लागत नाही. ‘याचि देही, याची डोळा’ हे ज्ञान होऊ शकतं. मात्र, त्यासाठी सेवा आणि समर्पण आवश्यक आहे.  सेवेमुळे मोक्ष आपल्या अंतरंगातच आहे व आपल्याच अस्तित्वाचाच एक अभिन्न भाग असल्याची जाणिव जागृती होते. जागृती येते तो क्षण महत्वाचा आहे. 


- प.पू. शंकरजी महाराज

मठाधिपती, जागृती-तपोवन आश्रम, खामगाव.
 

Web Title: spiritual: Only the Guru can show internal image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.