आत्मा हाच परमात्मा आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 03:31 PM2019-03-15T15:31:04+5:302019-03-15T15:31:27+5:30

जीव हाच शिव आहे.प्रत्येकाचे हृदयात ईश्वर वसला आहे.या आत्मारामाला भजावे.

The soul is the divine | आत्मा हाच परमात्मा आहे

आत्मा हाच परमात्मा आहे

googlenewsNext

जीव हाच शिव आहे.प्रत्येकाचे हृदयात ईश्वर वसला आहे.या आत्मारामाला भजावे. शुद्ध अंतकरणात ईश्वर वसलेला असतो. मनोभावे त्या ईश्वराची आराधना करुन आपलं निहीत कर्तव्य,जबाबदाºया पार पाडा. परम् अथार्ने जीवन जगा आणि परम सुखाचे धनी व्हा ! असा हितोपदेश तुकाराम महाराजांनी दिला. गुरुमाऊलींनी  मानसात देव शोधून त्यांना देवत्व प्राप्त करुन दिलं. प्रत्येकजण  देव आहे तर मग मानसा मानसात भेद कसला? असा सवाल विचारत  जाती धर्माच्या नांवानं भेदाभेद करणे महापाप आहे असा कळकळीने  महाराज सांगत असत.  आपल्या आत्मारामाला शुद्ध अंतकरणाने जपा. 
 राग लोभ  मत्सर द्वेष मोह माया अहंकार या पासून दूर रहा..दु:खी वंचित,असहाय गरजूंची सेवा करा,आईवडीलाची सेवा करा,रुग्णां
ची सेवा करा.हिच ईश्वराची खरी भक्ती आहे परमार्थ आणि परोपकार करा. निष्काम कमार्ला ज्ञान आणि भक्तीची जोड दिली तर ते सत्कर्म अधिक उजळून जाते. दैववादापेक्षाही प्रयत्नवादात मनुष्य हित दडलेलं आहे. म्हणूनच 'प्रयत्नांती परमेश्वर' हे तत्व महत्वाचं मानलं जाते. गुरुमाऊलींची ही शिकवण कालवाडीच्या संत तुकाराम बीज सोहळ्यातील अमोल ठेवा आहे. आजही  याच गुरुत्वाकर्षणाने  कालवाडी येथे तुकोबांच्या या संतवाडीत तुकोबाच्या गाथेचा जागर अभंगपणे चालवित गांवकरी गुण्यागोविंदाने नांदत आहे. कालवाडी सारखं अगदी छोट्याशा गांवाला प्रति देहू चे महात्म्य गुरुवर्यांनी प्राप्त करुन दिले आहे.
ही भूमी धन्य आहे.
 
- नंदकिशोर हिंगणकर 
   आकोट जि.अकोला
 

Web Title: The soul is the divine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.