मन करारे प्रसन्न...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 07:05 PM2018-10-15T19:05:55+5:302018-10-15T19:06:38+5:30

जीवंत मनुष्याचं प्रत्येक वर्तन हे मनाचे आज्ञेवर चालतं. मन हेच आपली दिनचर्या संनियंत्रीत करीत असतं आणि म्हणून मनापासून केलेले ...

Pleased with the heart ...! | मन करारे प्रसन्न...!

मन करारे प्रसन्न...!

Next

जीवंत मनुष्याचं प्रत्येक वर्तन हे मनाचे आज्ञेवर चालतं. मन हेच आपली दिनचर्या संनियंत्रीत करीत असतं आणि म्हणून मनापासून केलेले प्रत्येक काम यशस्वी होत असतो.असे म्हटल्या जाते. मन हे अस्थिर आहे. क्षणात ते क्षितीजा पलीकडे सैर करु शकते. एवढी वेग विलक्षण क्षमता कशातही नाही. मनाला स्थिर ठेवणे खुप अवघड आहे. त्या करीता साधना करावी लागते. मनावर सत्ता मिळवून अनेक ऋषी-मूनी संत महात्म्यांनी जग जिंकले आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाचे यशाचे गमक मन हेच आहे. मनस्वास्थ ठीक नसेल तर आपण काहीच करु शकत नाही. मना सारखं काही घडल्यास आपण सुखावतो तर मनाविरुध्द काही घडत असेल तेवढेच अस्वस्थ देखील आपण होवून जात असतो. मन हा अभ्यासाचा विषय आहे.मनाच्या स्थितीला जाणून घेणे खुप अवघड आहे. बुद्धी आणि मन याचा सहसबंध आहे कां? हा प्रश्न याठीकाणी महत्वाचा ठरतो. ज्ञान आणि बुद्धीच्या कसोटीवर मनाची स्थिती घडत असते. एखाद्या घटनेतील आपलं वर्तन हे घटनेविषयीचं आपलं ज्ञान कीती आहे तसं वर्तन बदल दिसून येत असतं.याचा अर्थ ज्ञाननावरच मनाच्या भूमिकेची उंची ठरते आपली आवड निवड ही मनावर अवलंबून असतं आपली सकारात्मक वा नकारात्मक भूमिका ही आपल्यातील मन निश्चित करीत असते. कुठलाही दृष्टीकोन ठरविण्यासाठी मन लागतं मनाची स्थिती ही कठोर असू शकते तेवढीच मृदु ही. जीवनातील विविधांगी अनुभव मनाच्या स्थितीला आकार देत असते. विचार हा मनाचा आधार आहे. .सुविचारांनी मनाची व्यापकता वाढते.तसेच वाईट विचार मन कलुषित करते. बरी-वाईट परिस्थिती मन प्रभावित करीत असतं प्रत्येकाला मन:शांती हवी आहे. धन दौलत, सत्ता संपत्तीच्या हव्यासापोटी आपण मन हरवून बसलो आहोत . मनाची संवेदना बोथट झाली आहे . आणि म्हणून आपण आनंद सुख समाधान या पासुन पारखे झालो आहे .

मन करारे प्रसन्न ।सर्व सिद्धीचे कारण॥ हेच अंतिम सत्य आहे.

- नंदकिशोर हिंगणकर, आकोट जि. अकोला

Web Title: Pleased with the heart ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.