दिल्लीपासून मुंबईपर्यंत दिसलं चंद्रग्रहण, पहाटे 4.29 वाजेपर्यंत राहणार प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 04:13 AM2019-07-17T04:13:23+5:302019-07-17T04:20:39+5:30

149 वर्षांनंतर दिसणाऱ्या दुर्मीळ चंद्रग्रहणाला सुरुवात झाली आहे.

Partial LunarEclipse as seen in the skies of Mumbai | दिल्लीपासून मुंबईपर्यंत दिसलं चंद्रग्रहण, पहाटे 4.29 वाजेपर्यंत राहणार प्रभाव

दिल्लीपासून मुंबईपर्यंत दिसलं चंद्रग्रहण, पहाटे 4.29 वाजेपर्यंत राहणार प्रभाव

Next

नवी दिल्लीः 149 वर्षांनंतर दिसणाऱ्या दुर्मीळ चंद्रग्रहणाला सुरुवात झाली आहे. 149 वर्षांपूर्वीही गुरुपौर्णिमेच्या दिवशीच चंद्राला ग्रहण लागलं होतं, त्यावेळी चंद्र हा शनि आणि केतूबरोबर धनू राशीमध्ये स्थित होता. तर सूर्य राहूसोबत मिथुन राशीमध्ये होता. मंगळवारी मध्यरात्री 1.31 वाजता चंद्रग्रहणाला सुरुवात झाली असून, पहाटे 4.29 वाजेपर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे. पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मधोमध आली असून, जवळपास तीन तास हे चंद्रग्रहण पाहता येणार आहे.

कोलकातातल्या एमपी बिर्ला तारामंडळ संशोधन आणि अकादमीचे संचालक देबीप्रसाद यांच्या मते, मध्यरात्री तीन वाजता चंद्रग्रहण स्पष्टपणे नजरेस पडणार आहे. जेव्हा चंद्राचा जास्त करून भाग कललेला असेल. खगोलीय हालचालींची आवड असणाऱ्यांनी ही संधी दवडता कामा नये, कारण 2021पर्यंत अशा प्रकारचं कुठलंही चंद्रग्रहण पाहता येणार नाही. भारतातल्या प्रत्येक भागातून हे चंद्रग्रहण थेट पाहता येणार आहे. चंद्राला पहाटे 4.29 वाजेपर्यंत हे ग्रहण लागलेलं दिसेल. पहाटे 3.01 वाजता चंद्राच्या 65 टक्के व्यास पृथ्वीच्या सावलीखाली असेल. भारतात पुढचं चंद्रग्रहण 26 मे 2021ला दिसेल, जेव्हा चंद्राला पूर्ण ग्रहण लागेल.


 

  • ग्रहणात हे करा अन् हे करू नका

ग्रहणात मंत्राचा जाप सुरूच ठेवला पाहिजे
ग्रहणात अन्न शिजवू नये किंवा काही खाऊ नये
खाण्या-पिण्याच्या वस्तूमध्ये तुळशीची पानं टाकून ठेवली पाहिजेत
ग्रहणात घरातल्या देवघराचे दरवाजे आणि पडदे बंद करणं गरजेचं आहे. 
ग्रहणात कोणतंही शुभ आणि नवं कार्य सुरू करू नये
ग्रहणात जीवाणूंचा प्रादुर्भाव तेजीनं वाढणार असून, तो पसरणार आहे. 
ग्रहणानंतर पूर्ण घरात गंगेच्या पाण्याचा शिडकावा करावा


वैज्ञानिकांच्या मते, पृथ्वी सूर्याची प्रदक्षिणा करते, तेव्हा चंद्र पृथ्वीच्या चारही बाजूंना फिरत राहतो. पृथ्वी आणि चंद्र फिरता फिरता एका क्षणी अशा स्थानावर येतात, जिथे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र तिन्ही एका सरळ रेषेत असतात. जेव्हा पृथ्वी फिरता फिरता सूर्य आणि चंद्राच्या मधोमध येते, तेव्हा चंद्र पृथ्वीच्या मागे लपतो. त्याच्यावर सूर्याची किरणं पडत नाहीत, यालाचा चंद्रग्रहण म्हटलं जातं. तर चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मधोमध येऊन सूर्याला झाकोळतो, त्याला सूर्यग्रहण म्हणतात.
पंचांगकर्ते मोहन दाते यांच्या माहितीनुसार, ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकाळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुनश्चरण ग्रहणामध्ये करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणाचा स्पर्श झाल्यानंतर मात्र झोप, मलमूत्रोत्सर्ग, भोजन व कामविषय ही कर्मे करू नयेत. अशौच असताना ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान, करण्यापुरती शुद्धी असते, असे दाते यांनी सांगितले. भारतासह संपूर्ण आशिया खंड, संपूर्ण युरोप, आफ्रिका खंड, दक्षिण अमेरिका, रशियाचा दक्षिण प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, प्रशांत महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर या प्रदेशात ग्रहण दिसणार आहे, असेही ते म्हणाले होते.

Web Title: Partial LunarEclipse as seen in the skies of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.