माळ नववी : आज महानवमी उपवास, आयुध नवमी, खंडे नवमी, नवरात्रोत्थापन !

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, September 29, 2017 5:23am

आज शुक्रवार, २९ सप्टेंबर, आज महानवमी उपवास, आयुध नवमी, खंडे नवमी, नवरात्रोत्थापन ! नवरात्रातील नऊ दिवस आज संपत आहेत. आज देवीची पूजा करून तिच्यासमोर नववी माळ बांधावयाची आहे.

आज शुक्रवार, २९ सप्टेंबर, आज महानवमी उपवास, आयुध नवमी, खंडे नवमी, नवरात्रोत्थापन ! नवरात्रातील नऊ दिवस आज संपत आहेत. आज देवीची पूजा करून तिच्यासमोर नववी माळ बांधावयाची आहे. या दिवसात शेतात तयार झालेले धान्य घरात येत असते म्हणून हा आदिशक्तीचा - निर्मितीशक्तीचा उत्सव साजरा करीत असतो. पृथ्वी ही धान्यनिर्मिती करीत असते. म्हणूनच पृथ्वीलाही ' माता ' असेच संबोधण्यात आले आहे. पृथ्वीमातेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पृथ्वीमातेला देवता मानलेले आहे. श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी आणि श्रीमहासरस्वती ही देवीची तीन रूपे मानली जातात. आजची घरची देवी ही श्रीमहाकालीप्रमाणे सामर्थ्यवान असली पाहिजे. तिच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे आहे. घरातील या दुगार्मातेला योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य विश्रांती मिळाली पाहिजे . घरची दुर्गा हीच श्रीमहालक्ष्मी आहे. तिला आर्थिक व्यवहार करण्याचे शिक्षण मिळाले पाहिजे. आर्थिक बचत तीच चांगल्या प्रकारे करू शकते. घरात वावरणारी ही दुर्गा हीच महासरस्वती आहे. ती सुशिक्षित असेल तर सारे घर सुशिक्षित होत असते. सावित्रीबाई फुलेंच्या अथक मेहनतीमुळेच स्त्रियांना शिक्षण मिळू लागले. घरची ही दुर्गा मुलांवर चांगले संस्कार करू शकते. जेवढ्या श्रद्धेने आपण मंदिरातील किंवा देव्हायार्तील देवीची उपासना करतो त्यापेक्षा जास्त श्रद्धेने आपण घरच्या दुर्गेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. देवीनेच दुष्ट राक्षसांचा नाश करून देवांना संकटमुक्त केले आहे. त्यामुळे समाजाची जर प्रगती करायची असेल तर स्त्रिया ' सबला ' होणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय स्त्रीदेवता श्रीआदिशक्ती दुगार्देवीची श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी आणि श्री महासरस्वती ही रूपे आपणास माहित आहेत. तसेच प्राचीन कालच्या पुराणात सांगितलेल्या नवदुर्गा- शैलपुत्री, ब्रह्मचारिणी,चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री याही आहेत. भारतातील स्त्रीदेवतांची ही मालिका पुराणापर्यंत राहून थांबलेली नाही, त्यानंतर त्या त्या कालात नवीन नवदुर्गा निर्माण होत गेल्या आहेत. आज नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी त्यांना वंदन करूया. प्राचीन कालच्या १) विद्वान , वाक्चातुर्य असणारी अरुंधती २) कर्दम ऋषींची कन्या अनुसूया ३) विदर्भ राजाची कन्या लोपामुद्रा ४) ब्रह्मवादिनी गार्गी ५) याज्ञवल्क्यांची पत्नी ब्रह्मवादिनी मैत्रेयी ६) सत्यवानाची पत्नी सावित्री ७) प्रभुरामचंद्रांची माता कौसल्या ८) गौतम ऋषींची पत्नी अहल्या आणि ९) रावणाची पत्नी मंदोदरी या नवदुर्गाच आहेत. त्यानंतरच्या नवदुर्गा - १) विश्वामित्र-मेनका यांची कन्या शकुंतला २) काशिराजाची कन्या अंबा ३) धृतराष्ट्राची पत्नी गांधारी ४) राजा शूरसेनाची कन्या कुंती ५) अजुर्नाची पत्नी, वीर अभिमन्यूची माता सुभद्रा ६) द्रुपद राजाची कन्या द्रौपदी ७) भगवान कृष्णाचे लालन पालन करणारी यशोदा ८) भगवान कृष्णाची माता देवकी ९) लक्ष्मीचे रूप असणारी श्रीकृष्णाची राधा या नवदुगार्नाही आपण नमस्कार करूया. तसेच १) ताटीचे अभंग म्हणणारी संत ज्ञानेश्वरांची भगिनी मुक्ताबाई २) संत कवयित्री कान्होपात्रा ३) भगवान श्रीकृष्णाची निस्सीम भक्त मीरा. ४ ) संत कवयित्री बहिणाबाई ५) उदयपूरच्या महाराणा संग्रामसिंहची पत्नी कर्मवती ६) उदयसिंह यांची दाई पन्नादाई ७) छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची माता जिजाबाई ८) समाजकार्य करणारी अहल्याबाई होळकर ९) झाँसीची राणी लक्ष्मीबाई या नवदुगार्नाही आपण नमस्कार करूया. त्यानंतरच्या १) अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणार्या डॉ. आनंदीबाई जोशी २) स्त्रीशिक्षण, स्त्रीमुक्ती , विधवा पुनर्विवाह यांच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले ३) स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या , सेवासदन संस्थेचे कार्य चालविणाºया रमाबाई रानडे ४) भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर ५) काव्य प्रतिभावंत बहिणाबाई चौधरी ६) पंडित नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी ७) तेजस्वी व परखड विचारवंत स्वातंत्र्य सेनानी अरुणा असफअली ८) अवकाश यात्री कल्पना चावला ९) बाबा आमटे यांच्या महान कार्यात सतत साथ देणारी त्यांची पत्नी साधनाताई या नवदुर्गांनाही आपण वंदन करूया. प्रत्येक कालात दुगार्देवी अवतार घेत असते. सध्याही अनेक दुर्गांनी समाजसेवेचा वसा घेतलेला आपणास दिसून येतो. सध्या अनेक क्षेत्रात या आधुनिक दुर्गा महान कार्य करीत आहेत. अनाथांची माता बनलेली सिंधुताई सपकाळ, देशरक्षण करतांना धारातीर्थी पडलेल्या वीर जवानाची पत्नी वीरांगना स्वाती महाडीक अशा आधुनिक नवदुर्गाना आपण नवरात्राच्या निमित्ताने अभिवादन करूया. नवरात्राच्या या नवव्या दिवशी मंदिरातील किंवा देव्हाºयातील दुर्गांबरोबरच घरात वावरणाºया दुर्गांच्या प्रगतीकडे अधिक लक्ष देऊया आणि भारतातील महान कार्य करणार्या सर्व बुद्घीवान देवीना वंदन करूया ! आज नवरात्रोत्थापनेच्या दिवशी प्रार्थना करूया 'या देवी सर्व भूतेषु बुद्धीरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनम: ।।'

संबंधित

दुर्गामातेला तब्बल 22 किलो सोन्याची साडी, किंमत वाचून व्हाल थक्क
सप्तश्रृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, आजची माळ सहावी
नवरात्रातील आरतीमध्ये नऊ दिवसांचे माहात्म्य, माळ सहावी
सणांचा गोडवा वाढविणा-या चॉकलेट्सची आवक वाढली, हँडमेड चॉकलेट्सना पसंती
पंचमीला अंबाबाईची गजारूढ स्वरूपात पूजा

आध्यात्मिक कडून आणखी

‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म
Shravan Special : रामेश्वर, औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं महत्त्व!
एकटेपण जगण्याचा क्षण म्हणजे दहीहंडी; सर्वांच्या मदतीने होते तो काला...
काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर आणि वैद्यनाथ ज्योर्तिलिंगांचं महत्त्व!
श्रावण स्पेशल : ओंकारेश्वर, केदारनाथ आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगांचं महत्त्व!

आणखी वाचा