चंद्रग्रहणाचे आज दुपारी ४ वाजल्यापासून वेध; वेधकाळामध्ये करता येईल गुरूपौर्णिमेचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:05 PM2019-07-16T12:05:10+5:302019-07-16T12:08:33+5:30

मोहन दाते : मंगळवारी रात्री १.३२ वाजता स्पर्श; तर बुधवारी पहाटे साडेचार वाजता मोक्ष

Lunar eclipse today from 4 o'clock in the afternoon; Vyhakala can be done in the worship of Guruvayoori | चंद्रग्रहणाचे आज दुपारी ४ वाजल्यापासून वेध; वेधकाळामध्ये करता येईल गुरूपौर्णिमेचे पूजन

चंद्रग्रहणाचे आज दुपारी ४ वाजल्यापासून वेध; वेधकाळामध्ये करता येईल गुरूपौर्णिमेचे पूजन

Next
ठळक मुद्देआजारी व्यक्ती, गर्भवती, अशक्त व्यक्ती आणि मुलांनी मंगळवारी रात्री ८.३० वाजल्यापासून ग्रहणाचे वेध पाळावेतपर्वकाळात (रात्री १.३० ते पहाटे ४.३०) मात्र पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोपणे ही कर्मे करू नयेतराशीनुसार फल असे -शुभ - कर्क, तुला, मीन, मिश्रफल - मेष, मिथून, सिंह, वृश्चिक, अनिष्ट -वृषभ, कन्या, धनु, मकर

सोलापूर : भारतासह जगभरात अनेक ठिकाणी दिसणाºया खंडग्रास चंद्रग्रहणाचा वेधकाळ उद्या, मंगळवारी दुपारी ४ वाजता सुरू होत असून, रात्री १.३० वाजता ग्रहणाचा स्पर्श अर्थात प्रारंभ होत आहे. 

रात्री ३.०१ वाजता मध्य असून, बुधवारी पहाटे साडेचार वाजता ग्रहणाचा मोक्ष अर्थात ग्रहण सुटणार आहे. ग्रहणाच्या दिवशीच गुरूपौर्णिमा असल्यामुळे वेधकाळामध्ये गुरूपूजन करता येईल. भोजन मात्र चार वाजेपर्यंतच करावे लागेल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

दाते म्हणाले की, हे ग्रहण रात्रीच्या तिसºया प्रहरात असल्याने तीन प्रहर आधी म्हणजेच दुपारी ४ वाजल्यापासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळणे आवश्यक आहे. 

वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जपजाप्य, श्राध्य ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन निषेध आहे. त्यामुळे अन्नपदार्थ खाऊ नयेत; पण या काळात आवश्यक पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप घेता येईल.

ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकाळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राध्द, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुनश्चरण ग्रहणामध्ये करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणाचा स्पर्श झाल्यानंतर मात्र झोप, मलमूत्रोत्सर्ग, भोजन व कामविषय ही कर्मे करू नयेत. अशौच असताना ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान, करण्यापुरती शुध्दी असते, असे दाते यांनी सांगितले. भारतासह संपूर्ण आशिया खंड, संपूर्ण युरोप, आफ्रिका खंड, दक्षिण अमेरिका, रशियाचा दक्षिण प्रदेश, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, प्रशांत महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर या प्रदेशात ग्रहण दिसणार आहे, असे ते म्हणाले.

आजारी, गर्भवतींसाठी...
- आजारी व्यक्ती, गर्भवती, अशक्त व्यक्ती आणि मुलांनी मंगळवारी रात्री ८.३० वाजल्यापासून ग्रहणाचे वेध पाळावेत. पर्वकाळात (रात्री १.३० ते पहाटे ४.३०) मात्र पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोपणे ही कर्मे करू नयेत. गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये, असेही दाते यांनी स्पष्ट केले. राशीनुसार फल असे -शुभ - कर्क, तुला, मीन, मिश्रफल - मेष, मिथून, सिंह, वृश्चिक, अनिष्ट -वृषभ, कन्या, धनु, मकर.

Web Title: Lunar eclipse today from 4 o'clock in the afternoon; Vyhakala can be done in the worship of Guruvayoori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.