आनंद तरंग - सुख-दु:खाचे समत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 05:02 AM2019-02-18T05:02:20+5:302019-02-18T05:02:41+5:30

संसारिकामधील जीवनमुक्त योगी जनक राजाच्या सुख-दु:खाच्या समत्व भावाबद्दल एक प्रसंग नेहमी सांगितला जातो. एकदा म्हणे, राजा जनकाच्या लाकडी महालाने पेट घेतला.

Happiness wave - happiness and suffering equation | आनंद तरंग - सुख-दु:खाचे समत्व

आनंद तरंग - सुख-दु:खाचे समत्व

googlenewsNext

प्रा. शिवाजीराव भुकेले

संसारिकामधील जीवनमुक्त योगी जनक राजाच्या सुख-दु:खाच्या समत्व भावाबद्दल एक प्रसंग नेहमी सांगितला जातो. एकदा म्हणे, राजा जनकाच्या लाकडी महालाने पेट घेतला. या वेळी राजा जनक न्याय-निवाड्याच्या ठिकाणी प्रजेशी संवाद साधत होते. शक्य होईल त्यांना समत्वभावाने न्याय देत होते. एवढ्यात एक सेवक ओरडतच जनकाजवळ आला आणि सांगू लागला, ‘महाल जळालायं! चला उठा.’ राजा जनकावर या नोकराच्या ओरडण्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट जनक म्हणाले, अरे वेड्या! माझा राजवाडा जळालाय. मी ऊर बडवून ओरडायला हवे होते; पण जो राजवाडा मी येथे येताना बरोबर आणला नव्हता व जाताना बरोबर नेणार नाही त्याच्यासाठी एवढा मोठा शोक काय म्हणून व्यक्त करू? राजा जनकाचे उत्तर ऐकून सेवकाने या संसारिकातील संतासमोर अक्षरश: लोटांगण घातले. खरंच, प्रत्येक घटनेकडे साक्षी भावनेने पाहणे व नियतीचे फासे अनुकूल पडले तर हुरळून न जाणे व प्रतिकूल पडले तर कोमेजून न जाणे ही खूप मोठी तपस्या आहे. चिखलात राहूनसुद्धा आपल्या पाकळ्यांना व सुगंधाला चिखल लागू न देणाऱ्या कमळाच्या फुलाप्रमाणे अनेक स्थितप्रज्ञ पुरुष संसाराच्या चिखलात राहतात; पण वेळ आल्यानंतर त्यापासून चटकन बाजूला होतात, तर दुसºया बाजूला कमळाच्या फूल संभाराच्या तळातील चिखलात राहणारे बेडूक चिखल खाण्यातच धन्यता मानते. घडलेल्या व घडणाºया प्रत्येक घटनेबद्दल शोक व्यक्त न करणाºयास पंडित संबोधताना श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे,

अशोच्यानन्व षोचस्त्वं प्रज्ञावादांस्य भावसे।
गतासुन गतासुंनष्च, नानुषोचन्ति पंडित:।।

 

Web Title: Happiness wave - happiness and suffering equation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.