संस्कारक्षम अपत्ये हीच खरी संपत्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 04:59 PM2019-04-15T16:59:31+5:302019-04-15T17:47:10+5:30

संस्कारक्षम अपत्ते हीच खरी संपत्ती आहे. अशी अपत्ये स्वत: नव्हे तर कुळाचा आणि देशाचा उद्धार करू शकतात. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही स्वत:पासून केली जाते.

Good children is real wealth! | संस्कारक्षम अपत्ये हीच खरी संपत्ती!

संस्कारक्षम अपत्ये हीच खरी संपत्ती!

Next

संस्कारक्षम अपत्ते हीच खरी संपत्ती आहे. अशी अपत्ये स्वत: नव्हे तर कुळाचा आणि देशाचा उद्धार करू शकतात. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही स्वत:पासून केली जाते. तेव्हाच ते कार्य पूर्ण होते. त्यामुळे संत तुकाराम महाराजांनी अशा मातापित्यांचा हेवा ईश्वराला देखील वाटतो असे सांगितले आहे.

कार्यसिद्धी आणि स्वहितापासूनच देशाचे बीज पेरले जाते. स्वहित याचा अर्थ या ठिकाणी समाजहित हा धरलेला आहे. मानवी मनाला वळण लावणाºया घटनांची सुरुवात घर नावाच्या छोट्या विश्वापासूनच होते. आणि त्यात आई-वडील यांचा सिंहाचा वाटा असतो. कोणतेही लहान बाळ हे अनुकरण करीत असते. त्याच्या आजूबाजूला घडणाºया प्रत्येक घटना या त्यांच्यावर परिणाम करत असतात. लहान वय हे संस्कारक्षम तर असतेच पण त्याची पाटीही कोरी करकरीत असते. अशा कोºया पाटीवर बालपणास दिलेल्या संस्कारावरच पुढील आयुष्यात मार्गक्रमण होते.

प्रत्यक्षात आपल्या वाट्याला येणारे सुख हे ज्याच्या त्याच्या कर्माने मिळत असते. कोणीही धनसंचय करून सुखी पिढी अथवा सुखी समाज निर्माण करू शकत नाही. तरीदेखील बहुतांश व्यक्ती या भौतिक सुखाच्या मागे लागून इतर मार्गाने धनसंचय करीत आहे. खरे तर आनंदी व्यक्तिमत्व, सकारात्मक विचार, सद्गुणी विद्वान आणि पराक्रमी पिढी निर्माण होणे जास्त गरजेचे आहे. 

चांगली संस्कारी अपत्ये झाली तर त्यांना धनसंचय करून देण्याची गरज नसते. कारण ती स्वत: सक्षम असतात. संस्काराचे मोती हे बालकाचे पहिले गुरू म्हणजे आई यांच्या पासून सुरुवात होते. आईचे व कुटुंबातील संस्कार योग्य झाले, तर समाज सुधारक तयार होण्यास वेळ लागत नाही. म्हणूनच प्रथम माता-पिता गुरु आहे. माझे ते माझेच मित्रांचेही माझेच असा म्हणणारा व्यक्ती केव्हाही सुखी होऊ शकत नाही. माणसाला देण्याची कला अवगत करावी लागते.

 संस्कार आणि सभ्यता याच भारत मातीत जन्म घेतात. व अमरत्व प्राप्त करतात. याच मातीने देशभक्त दिले, तर याच मातेने समाज सुधारक देखील दिले. फक्त आपल्यासाठीच नाहीतर सर्व विश्वाचे कल्याण होवो. असे म्हणणारे संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली अवघ्या सोळाव्या वर्षी जगाच्या कल्याणाची काम  करणे म्हणजेच विश्वरूप सामावणारे संत माऊली आपल्याकडे होऊन गेले. अमृतवाणीने सर्वांना मोक्ष मार्ग दाखवणारे आणि एका शब्दात विश्वाचे कल्याण चिंतणारे माऊली होय त्यांच्या विचारांची आज खरी गरज आहे.

सकल संकल्पाचे दाता: भगवान श्रीराम


श्रीराम कथा ही आपल्या संस्कृतीतील अविभाज्य घटक असून श्री राम कथेचे श्रवण केल्याने मनुष्य चारित्र्य संपन्न होतो. राम कथा आम्हाला दिशा तसेच दृष्टी देते. राम कथा श्रवण करण्यासाठी आध्यात्मिक भक्तीची तहान असावी लागते. श्रीरामांच्या चारित्र्यात अनेक मार्गदर्शक तत्वे आहेत. त्यांच्या जीवनातून कोणतीही गोष्ट आचरणात आणली तरी मनुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. श्रीराम कथा नुसते श्रवण नव्हे; तर ही कथा प्रभु श्रीरामांनी स्थापन केलेल्या आदर्शांचे अनुकरण करणे शिकविते. राम कथा आचरणात आणल्याशिवाय श्रवणाला महत्व प्राप्त होत नाही. राम कथेच्या श्रवणाने आचरणात पारदर्शकता तसेच चित्तामध्ये शुद्धता येते. राम कथा श्रवणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, मनुष्य चारित्र्यवान बनतो. सकल संकल्पाचे दाता म्हणूनही भगवान श्रीरामांकडे पाहल्या जाते. श्रध्दा...भक्ती आणि विश्वास या त्रिसुत्रीनेच भगवान श्रीरामांना प्रसन्न करता येते. मनोकामना पूर्ण करणारे दैवत म्हणूनही भगवान श्रीराम होत.


- प.पू. शंकरजी महाराज, मठाधिपती, जागृती-तपोवन आश्रम, खामगाव.

Web Title: Good children is real wealth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.